शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

‘त्या’ मातेच्या मृत्यूने वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:55 IST

पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी : अन्य विकारांवर इलाजच नाही, नातेवाईकाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : कोरोनामुक्त होऊनही मृत्यूने गाठलेल्या २१ वर्षीय मातेच्या जाण्याने पंधरा दिवसांची चिमुकली पोरकी झाली़ या मातेचा अचानक होणारा मृत्यू आरोग्य यंत्रणेच्या सुविधा व वैद्यकीय सेवेवर असंख्य प्रश्न निर्माण करणारा आहे़ १७ तारखेला महिलेची सुटी होईल असे डॉक्टरांनी सांगितले व दुसऱ्याच दिवशी मृत्यूचा फोन आला़ या महिलेला अन्य काही त्रास होता का? याकडे डॉक्टरांनी लक्षच दिले नाही, असे सांगत कोरोनाबाधित ते कोरानामुक्त व मृत्यू असा आरोग्य यंत्रणेवर ठपका ठेवणारा धक्कादायक प्रवास एका नातेवाईकांनी ह्यलोकमतह्णकडे मांडला आहे़ चिमुकली पोरकी झाली याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़लॉकडाऊनमुळे अडकली महिलाही गर्भवती महिला जळगावला बहिणीकडे २१ मार्चला आलेली होती़ जनताकफर्युनंतर एका दिवसात परत जावू असे ठरले होते़ मात्र, २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाल्याने महिला जळगावात अडकली़ दरम्यान, एप्रिल महिन्यात महिलेची एका खासगी रुग्णालयात प्रसुती झाली व तीने एका मुलीला जन्म दिला़ बाधित आढळल्यानंतर महिलेला कोरोना रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले होते़ चौदा दिवसानंतर स्वॅब निगेटीव्ह आले मात्र, पंधराव्या दिवशी मृत्यू झाल्याने नातेवाईकांना मोठा धक्का बसला़ या प्रकाराने कोरोना रुग्णालयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे़ रक्ताच्या गाठी तयार होऊन हृदयाचे ठोके बंद पडून मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात येत आहे़ मात्र, कुठलेली मृत्यूचे कारण स्पष्ट करणारे प्रमाणपत्र आम्हाला दिले जात नसल्याचे नातेवाईकाचे म्हणणे आहे़जिल्हा रुग्णालयाबाहेर रात्रभर थांबूनमहिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलेला एक दिवस त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात व्हँटीलेटरची सुविधा नसल्याने महिलेला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी महिलेचे वडिल व काही नातेवाईकांनी महिलेला तिथे हलविले दाखल केले मात्र, डॉक्टरांनी .... तुम्हाला कोरोना चाचणीशिवाय दाखल करू शकत नाही, असे सांगून जायला सांगितले़ रात्री परतण्याची कसलीच व्यवस्था नसल्याने चिमुकल्यासह ही माता व तिच्या नातेवाईकांनी रात्र बाहेरच काढली़ ही अशी आरोग्य सेवा आहे का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे़नेमका मृत्यू कसा झाला याचे कारण विचारल्यानंतर रक्ताच्या गाठींनी हृदय बंद पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ मग या आजारावर तुम्ही उपचार का केले नाही? ती महिला नुकतीच सिझेरीयन होऊन आली होती, तिच्या अन्य त्रासांकडे लक्ष का दिले नाही, अशी विचारणा डॉक्टरांना करताच त्यांनी फोन बंद केला़ अंत्यसंस्कार झाले, मात्र, आम्हाला अद्याप मृत्यूचे कारण असणारे प्रमाणपत्र मिळाले नाही, नेमके आम्ही काय समाजावे? सर्व काही कागदावर दिसते, प्रत्यक्षात आरोग्य सेवा शून्य आहे़ महिलेचे दुसरीकडे उपचार सुरू असते तर वाचली असती, पंधरा दिवसाची चिमुकली पोरकी झाली नसती- मृत महिलेचे नातेवाईक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव