शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू ममुराबादला, अंत्यसंस्कार जळगावला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 11:38 IST

ग्रामस्थांचे हाल : गावात स्मशानभूमीला शेड नाही

ममुराबाद, ता. जळगाव : गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी योग्य स्मशानभूमि नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. गावकऱ्यांना जळगाव शिवाजीनगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.सुमारे १५ हजारावर लोकसंख्या असलेल्या ममुराबाद येथे आजमितीस वापरात असलेली एकही अद्ययावत स्मशानभूमी नाही. परिणामी ग्रामस्थ गावालगतची शेती तसेच जळगाव-विदगाव रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेतच मृतदेहांवर अंत्यसंस्काराची वेळ निभावून जात असली तरी खरे हाल पावसाळ्यात सुरू होतात.पावसाची झडी सुरू असल्यास बºयाचवेळा ओली लाकडे पेट घेत नसल्याने मृतदेह अर्धवट जळण्याचे प्रकार घडतात. याशिवाय चिखलामुळे प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने मृतांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांना खूप हाल सहन करावे लागतात.पाऊस थांबायचे नावच घेत नसल्यास मृतदेह दिवसभर किंवा त्यापेक्षा जास्तवेळ घरात ठेवण्याचा प्रसंग येत असतो.अशा परिस्थितीत शेवटी नाईलाज म्हणून मृतदेह मालवाहू वाहनातून अंत्यसंस्कारासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीकडे रवाना केला जातो.तिथेही काहीवेळा जागा नसल्यास बराचवेळ ताटकळावे लागते. या सर्व प्रकाराबद्दल नेहमीच तीव्र नाराजीचा सूर उमटत असताना ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे अजुनही गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. निव्वळ मोक्याची जागा नाही म्हणून रखडलेला स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी त्यामुळे पुन्हा एकदा केली आहे.अंत्यसंस्कारासाठी लागतात घरची लाकडेएकसारखा पाऊस सुरू असताना ममुराबादच्या ग्रामस्थांकडून जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीचा पर्याय निवडला जात असला तरी महापालिकेकडून त्यांना कोणतेच सहकार्य मिळत नाही. अंत्यसंस्कारासाठी वापरली जाणारी लाकडेसुद्धा तिथे पुरविण्यात येत नाहीत. संबंधितांना त्यामुळे मृतदेहासोबत कोरडी लाकडेही घरून नेण्याची व्यवस्था करावी लागते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव