शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

रेल्वेतून पडल्याने केरळच्या तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:06 IST

स्थानिक केरळी बांधवांनी केली मदत

जळगाव : चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर रायपूर येथील नोकरी सोडून राजकोट येथे रेल्वेने जात असताना सूर्या सनिस कृष्णनकृती (वय २७ रा. नांगीयार कुरणंलरा पो. पेल्लीमनुर ता. पोट्टलयम जि. आलपी,केरळ ) या विवाहित तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास पाळधी गावाजवळ घडली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनिस कृष्णनकृती (वय ३) आणि त्यांची पत्नी सूर्या हे दोघे छत्तीसगड राज्यातील रायपूर येथेआयुर्वेदिक दुकानावर काम करत होते.गुजरात राज्यातील राजकोट येथे जास्त पगाराची नोकरीची संधी चालून आली. यासाठी दोघांनी रायपूर येथे आपल्या कामाचा राजीनामा दिला. नव्या कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी पती-पत्नी रेल्वेने राजकोट येथे रेल्वेने जात असतांना पाळधी -बांभोरी गावाजवळ दरवाजाजवळ सूर्या उभी असतांना तोल जाऊन खाली पडली.पत्नी खाली पडल्याचे लक्षात आल्यानंतर सनीसने तत्काळ साखळी ओढून रेल्वे थांबवली. झालेला प्रकार रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितला. यानंतर पाळधी येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगावात राहणारे केरळ राज्यातील नागरिकांनी कोणताही विलंब न करता जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य केले. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला जाणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव