शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डोळ्यासमोर पाहिला साक्षात मृत्यूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:49 IST

जळगाव : नदीतून पाणी घेऊन येत असताना अचानकपणे हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढविला.प्रतिकार करताना ताकद कमी पडली. हा प्राणी त्याच्या ...

जळगाव : नदीतून पाणी घेऊन येत असताना अचानकपणे हिंस्त्र प्राण्याने हल्ला चढविला.प्रतिकार करताना ताकद कमी पडली. हा प्राणी त्याच्या तोंडाने वारंवार गळ्याचा घोट घेण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र कधी हात तर कधी डोकं आडवे लावून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. डोक्यावरचा रुमाल गळ्याच्या भोवती लावला. तरीही तो रुमाल त्याने फाडून फेकला, शेजारी मजुर धावून आल्याने सुटका झाली. या मजुराला यायला पाच मिनिटे उशीर झाला असता तर या प्राण्याने जीव घेतला असता...अशी अंगाचा थरकाप उडविणारी आपबिती हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संजय तोताराम सपकाळे (४५, रा.भोलाणे, ता. जळगाव) यांनी सांगितली.शनिवारी सकाळी भोलाणे, देऊळवाडे व कानसवाडे येथील पाच शेतमजुरांवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली होती. दुपारी गावकऱ्यांनी या प्राण्याला ठार मारले. हा प्राणी कोणी तडस तर कोणी लांडगा सांगत असला तरी संजय सपकाळे यांच्यामते हा वेगळाच प्राणी असून प्रथमच असा प्राणी पाहिला आहे. मानवाचे रक्त या प्राण्याचे मुख्य खाद्य असल्याचे जाणवले.सरकारी मदत नाहीचही आपबिती सांगत असताना जखमी मजुर व त्यांच्या कुटुंबियाला रडू कोसळत होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेटी दिल्या, चौकशी केली. मदत करु म्हणून सांगितले, मात्र कोणतीच मदत प्रत्यक्षात मिळालेली नव्हती.थरारक झुंज आणि मजुरांची बोटे खाल्लीसंजय सपकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंस्त्र प्राण्याने डोक्यावर पंजा व तोंडाचे दात लावून रक्त ओढले. त्यामुळे प्रचंड खोलवर जखम झाली. गळ्यातून रक्त ओढण्याचा वारंवारचा प्रयत्न पाहून डोक्यावर चुंभळ म्हणून घेतलेला रुमाला गळ्याच्या भोवती लावला. ही झुंज पाहून शेजारच्या शेतातील विलास तुळशीराम कोळी यांनी धाव घेतली. संजय यांची सुटका करताना या प्राण्याने विलास यांच्या हाताचे एक बोट तोडले..दोघंही रक्तबंबाळ अवस्थेत पळत सुटले. विलास यांनी मोठा दगड या प्राण्याच्या दिशेने भिरकावला तो जोरात लागल्याने त्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात आपण डोळ्यासमोर साक्षात मृत्यू पाहिला. पुढे रस्त्यात शेतात वांगे तोडत असलेल्या लक्ष्मण श्यामराव कोळी (भोलाणे) यांच्यावर त्याने हल्ला चढविला. हा हल्ला परतवून लावताना या प्राण्याने लक्ष्मण यांच्या हाताची तीन बोटे खाल्ली. या घटनांमुळे या मजुरांना कायमस्वरुपी बोटाचे अपंगत्व आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव