शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्याजवळ ट्रक अपघातात पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपिकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:47 IST

एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली.

ठळक मुद्देअपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरारखिशातील ओळखपत्रामुळे पटली ओळख

पारोळा/पाल, जि.जळगाव : एका अज्ञात ट्रकने धडक दिल्याने पाल येथील वनप्रशिक्षण विद्यालयातील लिपीक कैलास धनसिंग राठोड (वय ३१, रा.पाल, ता.रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पारोळा येथे शनिवारी रात्री साडेनऊला घडली. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला.सूत्रांनुुसार, पाल, रा.रावेर येथील दादासाहेब चौधरी वनप्रशिक्षण विद्यालयात लिपीक असलेले कैलास धनसिंग राठोड हे आपली सासरवाडी वसंतनगर (पिंपळकोठा, ता.पारोळा) येथे शनिवारी मोटारसायकल (एमएच-१९-बी डब्ल्यू-२५४५) ने जात होते. ते पारोळा शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरून मार्गस्थ होत असताना एका अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला उडविले. ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. चेहरा चेंदामेंदा झाला. परिणामी सुरुवातीला त्यांची ओळख पटली नाही. मात्र खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना रात्रीच या घटनेबाबत माहिती दिली.माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या रुग्णवाहिकेतील चालक ईश्वर ठाकूर व रोशन पाटील यांनी, त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी भेट देत पंचनामा केला. याबाबत रात्री उशिरा अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.रविवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातParolaपारोळा