शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल सट्टा प्रकरणातील घनश्याम अग्रवाल यांच्याकडून हवाल्याचाही व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:59 IST

पोलीस तपासात उघड

ठळक मुद्देखालापूर न्यायालयात हजर करणार चौकशीत सट्टेबाजांचा म्होरक्या घनश्याम अग्रवाल असल्याचे निष्पन्न झाले होते

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ९ - आयपीएलच्या २०-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या टोळीचे प्रमुख सूत्रधार चोपड्यातील भाजपा नेता घनश्याम अग्रवाल हे हवाल्याचाही व्यवहार करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अग्रवाल हे कोणाकडून सट्टा घेत होते व कोणाला देत होते याची साखळी कशी आहे, याचा उलगडा करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोधीवली नजीक असलेल्या साई इन लॉजिंग या हॉटेलच्या २०१ क्रमांकाच्या खोलीत रायगड व पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली होती. तेथे विक्रम वारसमल जैन, नरेश रामस्वरुप अग्रवाल, नवीन बाळकृष्ण अग्रवाल, दीपक दौलतराम कृपलानी, नदीम मैमुद्दीन पठाण हे पाच सट्टेबाज दिल्ली डेअरविल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यावर सट्टा चालवत असल्याचे रंगेहाथ सापडले होते. त्यांच्याकडे झालेल्या चौकशीत सट्टेबाजांचा म्होरक्या घनश्याम अग्रवाल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार शनिवारी खालापूर पोलिसांनी चोपड्यातून अग्रवाल यांना अटक केली होती. न्यायालयाने अग्रवाल यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपणार असल्याने अग्रवाल यांना बुधवारी खालापूर न्यायालयात हजर केले जाणार आहे.आरोपींची संख्या वाढणार... या गुन्ह्यात आरोपींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती खालापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक खलील शेख यांनी ‘लोकमत’ ला दिली. अग्रवाल यांच्या आयपीएल सामन्यावरील सट्ट्याची साखळी कशी?, कोण त्यांना सट्टा द्यायचे, त्यानंतर पैशाचा व्यवहार कसा, अग्रवाल यांच्यावर कोण बुकी आहे. या सर्वांची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांना लवकरच अटक होणार असल्याचे शेख यांनी सांगितले. या चार दिवसाच्या पोलीस कोठडीत अग्रवाल हवाल्याचाही व्यवहार करीत असल्याचे उघड झाल्याची माहिती शेख यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव