शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव येथील खेडी शिवारातील विहिरीत आढळला मुंबईच्या कामगाराचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:17 IST

आत्महत्या की घातपात?

ठळक मुद्दे दुर्गंधीमुळे प्रकार उघडदोन तासांच्या प्रयत्नांनंतर काढला मृतदेह

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26-  खेडी शिवारातील एका शेतातील भूजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेच्या विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या उघडकीस आली़ मृतदेहाची दरुगधी आल्याने हा प्रकार उघड झाला. नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली़ त्यानंतर पट्टीच्या पोहणा:याच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला़ पोलिसांच्या प्राथमिक तपासात मयत वेल्डींग कामगार असून गोपाळ मनोहर चित्ते (वय-40, रा़खेडी, मूळ रा़ मुंबई) असे त्याचे नाव निष्पन्न झाले आह़े जुने जळगावातील रहिवासी दीपक प्रकाश महाजन यांचे जळगाव-भुसावळ महामार्गालगत खेडी शिवारात शेत आह़े या शेतात पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत भूजल सव्रेक्षण आणि विकास यंत्रणेची 13़20 मीटर खोल निरिक्षण विहिर आह़े एमआयडीसी पोलिसांनी शेतमालकाला दिली माहितीपरिसरात दरुगधी पसरली होती़ शेतालगत परिसरातील दुकानदार त्रस्त होत़े यातील एका दुकानदाराला शंका आल्याने त्याने विहिरीजवळ पाहणी केली असता त्याला या विहिरीत मृतदेह तरंगतांना आढळून आला़  त्याने तत्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती दिली़ त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अतुल वंजारी, बशीर तडवी, अशोक पाटील हे कर्मचारी घटनास्थळी आल़े कर्मचा:यांनी संबंधित शेतमालकाचा संपर्क मिळविला व त्यांनाही मृतदेहाच्या प्रकाराबाबत माहिती दिली़वाहनासह नागरिकांच्या गर्दीने वाहतूक विस्कळीतमृतदेहाबाबत माहिती वा:यासारखी पसरली़ त्यानुसार परिसरातील नागरिकांसह महामार्गावर ये-जा करण्या:या नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती़ महामार्गालगत बेशिस्तपणे वाहने उभे करुन नागरिक गर्दी करत होत़े यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़अतुल वंजारी यांच्यासह कर्मचा:यांनी परिसरातील दुकानदाराची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला़ यात काही दुकानदारांची ओळख पटविली़ टीव्ही टॉवरजवळील सरदारजीच्या वेल्डींगच्या दुकानदारावर कामाला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली़ त्यानुसार पोलिसांनी दुकानमालकाकडून माहिती घेतली असता गोपाळ मनोहर चित्ते असे त्याचे नाव असून तो मूळ मुंबईचा रहिवासी आह़े चार ते पाच दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचे निष्पन्न झाल़ेदोन तासांच्या प्रयत्नांनंतर काढला मृतदेहमृतदेह बाहेर काढण्यासाठी तांबापुरा परिसरातील पट्टीचा पोहणारा रवी हटकर, इब्राहीम खाटीक, सागर गोसावी, शोएब शेख नुरुद्दीन यांना पाचारण केल़े 11 वाजेला मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली़ रवी हटकर विहिरीत उतरला़ इतरांनी ताडपत्रीला दोर बांधून विहिरीत सोडली़ मृतदेह कुजलेला असल्याने हाती लागत नव्हता़ अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर हटकर याने मृतदेह सोडलेल्या ताडपत्रीत टाकला़ यानंतर विहिरीच्या बाहेर असल्याने साथीदारांनी तो वर ओढून तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढला़ रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला़