अडावद ता.चोपडा : अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर पंचकनजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 28 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमासास हा भीषण अपघात झाला. यामुळे महामार्गावर अधार्तास वाहतुक ठप्प झाली होती. पंचक ता. चोपडा येथील गणेश शांताराम महाले (वय 29) हा दुचाकीने (क्र. एम.एच.19 सीएन. 1410 ) जळगाव येथून पंचककडे येत असतांना पंचक कडून येणा:या दुसरी दुचाकीवरील ( क्र. एम.एच. 19 एआर. 9679) शेख तौफीक शेख मुख्तार (वय-32 रा. चिनावल ता. रावेर) यांची समोरासमोर जबर धडक झाल्याने दोघांचा जागेवर मृत्यू झाला. यामुळे महामार्गावर वाहतुक ठप्प झाल्याने दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होता. अपघाताची माहीती मिळताच पोउनि गणेश कोळी, कादीर शेख, रमेश माळी, योगेश गोसावी, चंपालाल पाटील, इब्राहिम शहा आदी घटनास्थळी दाखल झाले.
पंचकजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, 2 ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 19:16 IST
पंचकनजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 28 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमासास हा भीषण अपघात झाला.
पंचकजवळ दुचाकींची समोरासमोर धडक, 2 ठार
ठळक मुद्देअंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर अपघातवाहतुक ठप्प झाल्याने दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या