शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी तालुक्यात सर्वेक्षणाच्या कार्यवाहीबाबत दुष्काळ देखरेख समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 12:16 IST

खान्देशातील २० तालुक्यांचा समावेश

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील १३, धुळे ३ व नंदुरबार जिल्ह्यातील ४ तालुक्यांचा समावेश प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव : राज्य शासनाने दुष्काळासाठी तयार केलेल्या पद्धतीच्या निकषात खान्देशातील २० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यांमधील गावात पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही तत्काळ करण्याबाबत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा संचालकांनी (विस्तार व प्रशिक्षण) तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांना १२ रोजी पत्र दिले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ तालुके, धुळे जिल्ह्यातील ३ व नंदुरबार जिल्ह्यातील ३ तालुके गंभीर दुष्काळाच्या तर नंदुरबार जिल्ह्यातील एक तालुका मध्यम स्वरुपाच्या दुष्काळाच्या निकषात पात्र ठरला आहे.खान्देशात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली असल्याने त्याअनुषंगानेच निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. या निकषासाठी वनस्पती निर्देशांक, जलनिर्देशांक, पेरणीक्षेत्र आदी निकषांपैकी किमान तीन निकषांमध्ये पात्र ठरलेल्या तालुक्यांना पात्र धरण्यात आले आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर, यावल तर धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा या तालुक्यांचा गंभीर स्वरुपाच्या दुष्काळ असलेल्या तालुक्यांमध्ये समावेश असून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा या तालुक्याचा मध्यम स्वरुपाच्या दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात आला आहे.खान्देशातील या २०ही तालुक्यांमधील गावात पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षणाची कार्यवाही तत्काळ करण्याबाबत राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे सदस्य सचिव तथा संचालकांनी (विस्तार व प्रशिक्षण) तीनही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिका-यांना पत्र दिले आहे.दरम्यान, या संदर्भात १२ आॅक्टोबरपासूनच १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन माहिती भरण्याची (सत्यमापन) प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी ११ रोजी बैठकीत दिले होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईJalgaonजळगाव