शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गिरणा धरणातील आवर्तनाचे पाणी पोहचल्याने दहिगाव बंधारा ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 01:06 IST

गिरणा धरणातील आवर्तनाचे सोडलेले पाणी दहिगाव बंधाऱ्यात रविवारी पहाटे पोहचल्यानंतर हा बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे गिरणा नदीच्या काठावरील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

ठळक मुद्देदोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला गिरणा काठावरील गावांमध्ये समाधान

एरंडोल : गिरणा धरणातून ५ नोव्हेंबर रोजी सोडलेले पाणी जामदा बंधारा, भडगाव बंधारा, पाचोरा व गिरड बंधारा आणि उत्राण येथील बंधारा भरल्यानंतर रविवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता दहिगाव बंधारा येथे पोहचले. साधारणपणे १२ ते १५ तास हा बंधारा भरायला लागून पहाटे दोन ते तीन वाजेपर्यंत दहिगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला. सदरचे पाणी गिरणा नदीद्वारे म्हसावद तलाव, लमांजन तलाव, दापोरा तलाव भरून कानळदा गावापर्यंत देण्याचे नियोजन गिरणा पाटबंधारे यंत्रणेचे आहे. पाच ते सात दिवसात सदरचे पाणी कानळदा पर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे.या आवर्तनामुळे गिरणेच्या काठावरील व परिसरातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव या तालुक्यामधील सुमारे १० ते १२ लाखाच्यावर लोकसंख्येचा दोन ते तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मंजुरीनुसार सदर बिगर सिंचनाचे पहिले आवर्तन सोडण्यात आले. गिरणा धरणापासून सुमारे १७० कि.मी.पर्यंत पाणी पोहचणे अपेक्षीत आहे. या आवर्तनाचा कालावधी १० ते १५ दिवसांचा आहे.दहिगाव ४३ दलघफू, लमांजन ४० दलघफू, म्हसावद १५ दलघफू, दापोरा २५ दलघफू, याप्रमाणे या बंधाºयामध्ये पाणी साठविले जाणार असल्याची माहिती विभागाचे उपविभागीय अधिकारी मकरंद अत्तरदे यांनी ‘लोकमत’ला दिली .पाणी चोरी रोखण्यासाठी उपाययोजनापाण्याचा अवैध वापर किंवा पाणीचोरी होवू नये म्हणून स्थानिक व विभागीय स्तरावर दक्षता पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी हे देखील कार्यरत आहेत. याशिवाय गिरणा नदीकाठावरील गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, विद्युत मंडळ प्रशासन इत्यादींना अवगत करून पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याबाबत दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :Waterपाणी