आपल्या जिल्ह्यातील मोठे भाऊ, लहाने भाऊ, आप्पा, आबा, दादा, भैय्या सर्वच जण कसे नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. भांडतात म्हणजे जनतेच्या प्रश्नासाठी भांडतात.., जनता सर्वपरी मानून जनतेचा कोणताही प्रश्न आला म्हणजे आपले पुढारी एकमेकांविरोधात भांडायला पण कमी पडत नाहीत. आणि जनता व शेतकऱ्यांचे हित आले म्हणजे सर्व विसरून एकत्र यायला देखील कमी पडत नाहीत. आता हेच पहा ना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच पहा ना, आमच्या इकडचे भाऊ आणि तिकडचे भाऊ किती जानी दुश्मन आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मांडीला मांडी लावून बसून शेतकऱ्याच्या भल्यासाठी सर्वपक्षीय पॅनल तयार करत आहेत. मागच्या पाच वर्षापुर्वी पण आमचे भाऊ व तुमचे भाऊ एकत्र आले होते. मग शेतकऱ्यांचे भलेच करून सोडून दिले. मात्र,आता आबा, अप्पा आता यावर्षी थांबून इतरांनाही शेतकऱ्यांचे भले करू द्या म्हणजे झाले.
अजय पाटील, जळगाव.