शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

वादळाने उच्च क्षमतेची वीज तार रिक्षावर पडल्याने पडून जळगावात दोघांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:47 IST

वादळी वा-यामुळे उच्च क्षमतेची विजेची तार तुटून रिक्षावर पडल्याने वीज प्रवाह उतरुन रिक्षाने पेट घेतला, त्यात इम्रान शेख फय्याज (वय ३५, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व इम्रान शेख इमाम खान (वय ३०, रा.अक्सा नगर, जळगाव, मुळ रा.न्हावी, ता.यावल) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली.

ठळक मुद्दे संतोषी माता चौकात हाहाकार   रिक्षात बसून चहा घेत असता रात्री १०.३५ वाजता घडली घटना एकाचा जागेवरच तर दुस-याचा रस्त्यात मृत्यू

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,६ : वादळी वा-यामुळे उच्च क्षमतेची विजेची तार तुटून रिक्षावर पडल्याने वीज प्रवाह उतरुन रिक्षाने पेट घेतला, त्यात इम्रान शेख फय्याज (वय ३५, रा.मास्टर कॉलनी, जळगाव) व इम्रान शेख इमाम खान (वय ३०, रा.अक्सा नगर, जळगाव, मुळ रा.न्हावी, ता.यावल) या दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली.

पावसामुळे दुकानात न जाता रिक्षात बसले अन् काळाने झडप घातलीयाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री नऊ वाजता शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. याचवेळी इम्रान शेख फय्याज व इम्रान शेख इमाम खान हे दोन्ही मित्र मेहरुणमधील संतोषी माता चौकातील नागोरी चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले. पावसामुळे ते दुकानात न जाता रिक्षात बसून चहा पित असताना रात्री १०.३५वाजता अचानक वादळामुळे भर पावसात उच्च क्षमतेची वीज वाहिनीची तार तुटली व ती रिक्षाच्या पुढील टायरवर पडली. लोखंडाला स्पर्श झाल्याने क्षणातच रिक्षाने पेट घेतला व टायरही फुटले. यावेळी कोणाला काही कळण्याच्या आतच रिक्षात बसलेले दोन्ही इम्रान होरपळले.नागरिकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला मृत्यूपाऊस सुरु असताना अचानक वीज तार तुटून रिक्षा (क्र.एम.एच.१९ व्ही.६३२७) व त्यातील दोघं जण जळत असताना दुकानातील लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले, मात्र पाण्यात व रिक्षात वीज प्रवाह उतरल्याच्या भीतीने कुणाचीही त्यांच्या जवळ जाण्याची हिंमत झाली नाही. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी रिक्षाजवळ मदतीसाठी धाव घेतली. इम्रान शेख फय्याज हा तरुण जागीच ठार झालेला  तर दुसरा रिक्षा मालक इम्रान खान हा गंभीररित्या भाजला. दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र रुग्णालयात प्रवेश करताच खान याचीही प्राणज्योत मालवली.ओळख पटण्यास विलंबघटनास्थळावर फक्त इम्रान शेख फय्याज याचीच ओळख पटली होती, दुसºया इम्रान खान याची ओळख पटलेली नव्हती. जिल्हा रुग्णालयात दोघांना आणल्यानंतर डॉक्टरांनी इम्रान शेख याला मृत घोषीत केले तर खान याचा इसीजी व इतर तपासण्यात करण्यात आल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी त्यालाही मृत घोषीत करण्यात आले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा