शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन घ्यायला जाणा-या सायकलस्वार वृध्दाला डंपरने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 17:30 IST

सायकलीने बॅँकेत पेन्शन घ्यायला जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता.धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता एस.टी.वर्कशॉपजवळ घडली. शिंदे यांच्या डोक्यावरुन टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.

ठळक मुद्दे जळगाव शहरातील एस.टी.वर्कशॉपजवळील घटना  संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडून चालकाला चोपले

जळगाव : सायकलीने बॅँकेत पेन्शन घ्यायला जात असलेल्या मुरलीधर वेडू शिंदे (७३, रा.आयोध्या नगर, जळगाव, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे) यांना समोरुन माती घेऊन येत असलेल्या भरधाव डंपरने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता एस.टी.वर्कशॉपजवळ घडली. शिंदे यांच्या डोक्यावरुन टायर गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन ते जागीच गतप्राण झाले.दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर हल्ला चढवून चालकाला बेदम चोप दिला. एमआयडीसी व शहर वाहतूक पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने चालकाचा बचाव झाला. त्याला जमावाच्या तावडीतून सोडवून शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नरेंद्र रमेश मराठे (२२, रा.पार्वती नगर, जळगाव) असे डंपर चालकाचे नाव आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरलीधर शिंदे हे एस.टी.महामंडळातून सेवानिवृत्त झाले होते. मंगळवारी ते स्टेट बॅँकेत पेन्शन घेण्यासाठी घरुन सायकलीने निघाले. एस.टी.कर्मचाºयांच्या निवासस्थानाकडून येत असताना नेरी नाका स्मशानभूमीकडून माती घेऊन येत असलेल्या डंपरने (क्र.एम.एच.१९ झेड.८०२४) वळण घेत असताना शिंदे यांना चिरडले. डंपरचे टायर शिंदे यांच्या डोक्यावरुन गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावर सर्वत्र मांसाचे तुकडे पडलेले होते.बॅँकेच्या पासबुकवरुन पटली ओळखशिंदे यांच्याजवळ बॅँकेचे पासबुक होते. त्यावरुन त्यांनी ओळख पटली. तेथून नागरिकांनी शिंदे यांचा मुलगा किरण याला घटनेची माहिती दिली. तो एमआयडीसीत कंपनीत होता. तो येण्याआधी पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता.दरम्यान, याच डंपरमध्ये सायकल टाकून ते शनी पेठ पोलिसात नेण्यात आले. रवींद्र चौधरी यांच्या मालकीचे डंपर असल्याचे सांगण्यात आले. डंपर चालक मद्याच्या नशेत होता,असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव