शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

सायकलवीरांनी २४ तासात ४०० किमी अंतर पार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:01 IST

चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार केले.

ठळक मुद्देचाळीसगावच्या तिघांनी कडाक्याच्या थंडीत साध्य केले लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : हाडं गोठवणाऱ्या गारठ्यात तिघांनी पहाटे ६ वाजता औरंगाबादच्या क्रांती चौकातून देवघाटकडे जाण्यासाठी सायकलींना पायडल मारले. पुढे २४ तास त्यांच्या सायकलीचे चाक फिरतच होते. लक्ष्य होते २७ तासांचे. मात्र चाळीसगावच्या टोनी पंजाबी, रवींद्र पाटील आणि अरुण महाजन या तिघा सायकलवीरांनी २४ तासातच ४०० किमी अंतर पार करून बीआरएम स्पर्धेत आपल्या यशाची लखलखीत मुद्रा कोरली. ४५ वर्षीय टोनी खैरातीलाल पंजाबी, ५९ वर्षीय रवींद्र पाटील आणि ४२ वर्षीय अरुण हिरामण महाजन हे तिघे हौशी सायकलिस्ट. दरदिवशी पहाटे उठून सायकलफेरी आवर्जून करतातच. हौशेला स्पर्धेचा आयामही त्यांनी दिला आहे. शनिवारी त्यांनी जगप्रसिद्ध एडॉक्स सायकल ग्रुपतर्फे आयोजित ४०० किमी सायकलिंग स्पर्धेत सहभाग घेऊन लक्ष्य साध्य केले. या तिघांवरही काैतुकाचा वर्षाव होत आहे.

टार्गेट ६०० किमीचे, १३ला सायकली धावणार

१३ रोजी ६०० किमी अंतराची स्पर्धा होत असून यासाठी ४० तासांचा अवधी ठेवण्यात आला आहे. तिघेही सायकलवीर सध्या यासाठी कसून सराव करीत आहे. धुळे ते टिकरी (मध्य प्रदेश) पुन्हा धुळे येथे येऊन नाशिकला जायचे. पुन्हा तेथून धुळे येथे परत यायचे, असे स्पर्धेचे टार्गेट आहे. 

औरंगाबाद-देवघट ते मांजरसुंभा परत औरंगाबाद

शनिवारी कडाक्याच्या थंडीत स्पर्धेतील सायकलवीरांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. औरंगाबादहून देवघट ते मांजरसुंभा आणि परत औरंगाबाद, असे एकूण ४०० किमीचे अंतर २७ तासात पार करावयाचे होते. चाळीसगावच्या या तिघा सायकलवीरांनी हे अंतर २४ तासातच पूर्ण केले. यात पूर्ण रात्रीची १२ तासही त्यांची सायकल स्पर्धेच्या अंतिम लक्ष्यापर्यंत झेपावत होती. थंडीच्या गारठ्याचे कडे भेदत त्यांचे प्रत्येक पायडल कसोटी पाहणारे ठरले. मात्र तिघांची जिद्द सायकलच्या चाकाप्रमाणेच न थांबता फिरत राहिली. रविवारी पहाटे ६ वाजता त्यांनी पुन्हा क्रांती चौक गाठला. त्यावेळी तिघांच्या नावापुढे यशाची पताका रोवली गेली होती. 

२०० व ३०० किमी स्पर्धेतही यशाचे तोरण

टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजन हे दरदिवशी ५० किमी सायकल चालवतात. ४०० किमी स्पर्धेच्या आधीदेखील २०० किमीच्या धुळे ते मालेगाव आणि धुळे ते शिरपूर हे लक्ष्य त्यांनी साडेनऊ तासात गाठले. यासाठी साडेतेरा तासांंचा अवधी निर्धारीत केला होता.

यशाचे तोरण 

धुळे ते नाशिक आणि नाशिक ते धुळे हे ३०० किमी अंतर १५ तासात पार करून या स्पर्धेतही तिघांनी यशाचे तोरण बांधले. टोनी पंजाबी हे व्यवसाय करतात. रवींद्र पाटील हे स्टेट बँकेच्या कृषी शाखेत गाडी चालक असून अरुण महाजन पिलखोड येथील पेट्रोलपंपावर व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. 

सायकलफेरी पर्यावरणस्नेही आहे. नियमित सायकल चालविल्याने शरीर बळकट होते. इम्युनिटी वाढते. गुडघ्यांचेही आजार उद‌्भवत नाही. शरीराचे मसल्स बिल्ड होतात. दिवसभर प्रसन्न वाटते. नियमित सायकल चालविण्याचे असे अनेक फायदे आहेत.- टोनी पंजाबी, रवींद्र पाटील, अरुण महाजनसायकलवीर, चाळीसगाव

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावCyclingसायकलिंग