शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाळधीत तणावपूर्ण शांतता! २ गटात तुफान दगडफेक; शंभरहून अधिक जणांविरूध्द गुन्हा; ५८ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2023 19:54 IST

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

सागर दुबे

पाळधी (जळगाव) : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी दुसऱ्या दिवशी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील सर्व शाळा, दुकाने बंद होती. रात्री धरणगाव पोलिसात दोन्ही गटातील शंभरहुन अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू करत ५८ जणांना अटक केली आहे. दरम्यान, गावात तणावपूर्ण शांतता असून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंगळवारी रात्री पाळधी गावातील एका धार्मिक स्थळाजवळून काही लोक जात असताना त्यांच्यावर अचानक दगडफेक झाली. या घटनेची माहिती गावात पसरल्यानंतर काही जणांनी पाळधी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. हे प्रकरण पोलिसांकडून हाताळले जात असतानाच, गावात दोन गटात तुफान दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी पोलिसांचे वाहन तसेच पंचासत समिती सदस्याच्या वाहनाची सुध्दा तोडफोड केला. त्यामुळे प्रचंड तणाव वाढला होता. काहींनी तर दुकानांची तोडफोड करून त्यातील सामान बाहेर काढून चोरून नेले. मात्र, वेळीच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता रात्री बघायला मिळाली.

गुन्हा दाखल, धरपकड सुरूपाळधीतील दगडफेकी प्रकरणी बुधवारी धरणगाव पोलिसात दोन्ही गटातील शंभरहून अधिक जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७, ३०७, ३५३, ३३२, सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम ३,३७(१)(३)चे उल्लंघन आदी कलमान्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाळधीचे सपोनि प्रमोद कठोरे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी गावातील सीसीटीव्ही तपासून संशयित निष्पन्न केले असून रात्री आणि सकाळी धरपकड कारवाई राबवून एकूण दोन्ही गटातील एकूण ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी पोलिसांनी तोडफोड झालेल्या दुकानांचे पंचनामे केले. त्यावेळी काही दुकानदारांनी आमचा काही एक संबंध नसताना आमच्या दुकानांचे नुकसान केल्याची भावना व्यक्त केली.

३१ पर्यंत संचारबंदी लागू गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा, यासाठी एरंडोल उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी बुधवार, दि. २९ मार्चच्या सकाळी ११ ते शुक्रवार, दि. ३१ मार्चच्या सकाळी ११ वाजेपर्यंत गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून बुधवारी गावातील सर्व शाळा, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर शाळेतील परीक्षाही स्थगित करण्यात आल्या होत्या. सायंकाळी संशयितांना वैद्यकीय तपासणीसाठी धरगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले होते.

 

टॅग्स :JalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक