शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १ मे पर्यंत संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र या काळात आवश्यक वैद्यकीय सेवा, किराणा दुकाने, भाजी विक्री, फळे विक्री डेअरी सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रवासी वाहतूक देखील सुरू राहणार आहे.

सर्व कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम द्यावे, तसेच त्यातून शासकीय कार्यालये, बँका, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, विमा आणि मेडिक्लेम कंपन्या, औषध वितरणाशी संबधित कार्यालये, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व न्यायालये, लवाद, चौकशी समिती कार्यालये, तर वकिलांचे कार्यालय, सुरू राहू शकतात. हॉटेल्स होम डिलिव्हरी करु शकतात. तसेच कोविड नियमावलीचे पालन न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्याचे आदेशात म्हटले आहे.

उद्योगांवर देखील बंधने

अत्यावश्यक सेवेशी संबंधित निर्मिती करणारे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. ज्यावर निर्यातीचे बंधन आहे. अशा अस्थापना सुरू राहतील. पण त्यांना निर्यातीचे बंधन सिद्ध करावे लागेल. तसेच ज्या युनिटमध्ये उत्पादन प्रक्रिया अचानक थांबवता येत नाही असे कारखाने ५० टक्के कामगार क्षमतेने सुरू राहतील. या आदेशात सूट दिलेल्या कारखान्यांशिवाय इतरांनी या १ मे पर्यंत कारखाने बंद ठेवावे.

शाळा महाविद्यालये बंद, दहावी,बारावीच्या परीक्षेला सूट

जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद असतील. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षेला यातून सूट देण्यात आली आहे. तसेच राज्याबाहेर घेण्यात येणाऱ्या परीक्षांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधीत विभागाला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.