शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

तापी तटावर वादळी पावसाने पिके जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 22:06 IST

सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त केल्या.

ठळक मुद्देरावेर तालुक्यात सुमारे चार-पाच हजार हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा नामशेष. झाडे उन्मळून वाहतूक विस्कळीत, वीजखांब व ट्रान्स्फॉर्मर कोसळून  वीज खंडित.

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर : तालुक्यातील उत्तरेला सातपुड्याच्या पायथ्यालगत मंगळवारी दुपारी तुफान वादळी पावसाने सुमारे चार ते पाच हजार हेक्टरमधील ऐन हातातोंडाशी आलेल्या कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त केल्या. यात कोट्यवधी रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या परिसरातील शेकडो लोकांच्या घरावरील तथा शेतमालाच्या गोदामांवरील टीनपत्र्याचे छत उडून वादळात बेपत्ता झाल्याने एकच हाहाकार उडाला आहे. 

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या मोहगण, अहिरवाडी व पाडळे शिवारातील केळीबागा वायव्यकडून आग्नेय दिशेला जाणाऱ्या वादळी पावसाच्या तडाख्यात भुईसपाट झाल्याने नुकसान झाले. मात्र काही मिनिटांचा तो क्षणिक ट्रेलर मंगळवारी दाखवत गुरुवारी दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास मात्र तापीकाठच्या वीजांच्या कडकडाडात मुसळधार पावसासह तुफान वादळी वाऱ्यांच्या अकांडतांडवात खिर्डी, रेंभोटा, वाघाडी, शिंगाडी, धामोडी, सुलवाडी, कोळदा, ऐनपूर, निंबोल, विटवे, निंभोरासीम या गाव शिवारातील अंदाजित सुमारे तीन ते चार हजार हेक्टरमधील ऐन कापणीवरील केळीबागा जमीनदोस्त झाल्या. 

या तुफान वादळी पावसाचा आवेग एवढा भयावह होता की या परिसरातील ग्रामीण रस्त्यांवर व शेतीशिवारात मोठमोठे वृक्ष उन्मळून तथा वीजखांब व वीज ट्रान्स्फॉर्मर कोलमडून पडले. परिणामी या तापी काठावरील प्रभावित गावांना जोडणार्या ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

तुफान वादळासह मुसळधार पावसामुळे तापीकाठच्या या गावांमधील असंख्य घरांवरील टीनपत्रे उडून बेपत्ता झाल्याने अनेकांचा संसार उघडय़ावर पडला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतमालाच्या गोदामांची आच्छादने उडून गेल्याने शेतमालाचे भिजून नुकसान झाले आहे.  महावितरणचे वीजखांब व वीज ट्रान्स्फॉर्मर कोलमडून पडल्याने तथा वीजतारा खंडित झाल्याने लाखो रुपयांची अपरिमित हानी झाली आहे. या आपद्ग्रस्त भागातील वीजपुरवठा व पर्यायाने नळपाणीपुरवठा योजना ठप्प पडून अंधाराच्या काळोखाचे सावट पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रभुचरण चौधरी यांनी नुकसानीचे सर्व्हेक्षण करून गावागावातील गावठाण फिडर सुरू करण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेतली आहे. 

 तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिले पंचनाम्यांचे आदेश

तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी शुक्रवारपासून तापीकाठच्या या वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतीगटातील शेतमालाच्या नुकसानीचे व घरांच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून करण्याचे आदेश दिले आहेत. पं.स. सदस्य जितेंद्र पाटील यांनी शेत नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.  

मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारे व पावसाचा तडाखा 

मुक्ताईनगर  : तालुक्याला २७ मे रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान जबरदस्त वादळी वाऱ्याने तडाखा देत पावसाने झोडपले. या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील नायगाव, पिंपरीनांदू , शेमळदे मुंढळदे, उचंदे, मेंढळदे या परिसरातील शेकडो हेक्टर शेत जमिनीवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरRainपाऊसcycloneचक्रीवादळ