शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उमाळे, धानवड शिवारात पिके गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:44 IST

जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून ...

जळगाव : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील उमाळे व धानवड शिवारात शेतातील पिके वाहून जाण्यासह विजेचे खांब उन्मळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतांमध्ये पंचनामे सुरू झाले आहे. कानळदा येथेही विजेच्या धक्क्याने गाय मृत्यूमुखी पडली. जामनेर (८३.५ मि.मी.) व चाळीसगाव (७०.१ मि.मी.) येथे अतिवृष्टी झाली.गेल्या ११ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शनिवारी रात्री जोरदार पुनरागमन झाले. मध्यरात्री एक वाजेपासून पावसाचा जोर वाढून पहाटेपर्यंत झालेल्या दमदार पावसाने उमाळे व धानवड परिसरात शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतातील कपाशी व इथर पिके वाहून गेली. अनेक ठिकाणी शेतातील मातीही वाहून गेली असून दगड-गोटेच शिल्लक आहे.गाय मृत्यूमुखीकानळदा येथे शेतात विजेच्या धक्क्याने एक गाय मृत्यूमुखी पडली. विजेच्या खांबाचा स्पर्श होऊन गायीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.पंचनामे सुरूझालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून तलाठी, कृषी सहायक शेतांमध्ये पोहचले.सुभाषवाडीत वीज पडून बैल जोडी ठारजळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे २० रोजी रात्री झालेल्या पावसात वीज पडून बैलजोडी ठार झाली. प्रकाश पन्नालाल राठोड यांच्या खळ्यात ही घटना घडली.दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.बळीराजावर पुन्हा संकटजून महिन्यात उशिरा आलेल्या पावसामुळे लागवड लांबली. कशीबशी लागवड झाली व आहे त्या पाण्यावर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाऊस झाला व पेरण्या वाढल्या. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदिल झाला. त्यानंतर शनिवारी रात्री पाऊस आल्याने पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र जोरदार पावसाने उमाळे, धानवड शिवारातील शेतांमध्ये होत्याचे नव्हते केल्याने बळीराजावर पुन्हा संकट ओढावले आहे.विजेचा खांब कोसळलाशेतात पाणी शिरुन माती वाहून गेल्याने विजेचा खांबही उन्मळून पडला. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला होता. सुदैवाने विजेचा खांब कोसळला त्या वेळी शेतात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. 

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव