शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या एस.पींच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:04 IST

विविध गृपच्या नावाने फिरणारे आणि  गुन्हेगारी करणारे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या कायमस्वरुपी संपविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यासाठी २० पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील टोळ्या, विविध गृप व स्वतंत्ररित्या गुन्हे करणाºया गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वतंत्र पथकाची नियुक्ती  संघटीत गुन्हे करणा-यांची यादी तयारमोका, एमपीडीएसारखी कठोर कारवाई

जळगाव : विविध गृपच्या नावाने फिरणारे आणि  गुन्हेगारी करणारे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या कायमस्वरुपी संपविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यासाठी २० पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील टोळ्या, विविध गृप व स्वतंत्ररित्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाची महाविद्यालयाच्या आवारातच खून झाल्याची घटना गेल्या शनिवारी घडली होती. या घटनेत अटक केलेले संशयित हे जे उद्याचे भविष्य समजतो ते तरुणच गुन्हेगारीकडे वळल्याचे पाहून पोलीस अधीक्षकांनी शहरातील तरुणांमधील गुन्हेगारी कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगारांमध्ये दबदबा तसेच त्यांची पार्श्वभूमी माहित असलेल्या मोजक्याच २० पोलिसांची निवड पोलीस अधीक्षकांनी केली आहे. या कर्मचाºयांची एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत गुन्हेगारी करणाºया टोळ्या, संघटीत गुन्हेगार, विविध गृप यांची यादी तयार करण्यात आली.  त्याशिवाय भविष्यात करावयाची कारवाई  व उपाययोजना याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, या गुन्हेगारांचे फोटोही संकलित करण्यात आले आहेत. शहरात लावण्यात येत असलेल्या फलकांवरही पोलिसांची नजर आहे.विना क्रमांकाचे वाहने रडारवरशहरात गुन्हेगारी करणा-या वेगवेगळ्या गृपच्या तरुणांनी त्यांच्या दुचाकींवर क्रमांकाऐवजी गृपचे नाव टाकले आहे. एकेका दुचाकीवर तीन जण मिळूनच हे तरुण वावरत असतात,अशी वाहने जमा करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी क्रमांक टाकल्याशिवाय दुचाकी बाहेर जावू नये याबाबत शनिवारी दुचाकी विक्री करणा-या व्यावसायिकांना पत्र दिले. पथक थेट एस.पींच्या नियंत्रणातनव्याने तयार करण्यात आलेल्या पथकातील प्रत्येक कर्मचारी हा थेट पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र व्हाटस्अ‍ॅप गृपही तयार करण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर कारवाया करताना लागणारी मदत देखील पोलीस अधीक्षकच उपलब्ध करुन देणार आहे. या पथकात पोलीस ठाणे व एलसीबीचे मोजकेच कर्मचारी घेण्यात आलेले आहेत. -तरुण मुले गुन्हेगारीकडे वळल्याने त्यांचे भवितव्य वाईट आहे. वेळीच त्यांना रोखणे गरजेचे आहे. तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी  हद्दपारी, मोका व एमपीडीएसारखी कठोर कारवाई जाणार आहे. तरुणांमधील गुन्हेगारी संपुष्टात आणणे हाच आपला संकल्प आहे. -डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव