शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

गुन्हेगारांची हद्दपारी कागदोपत्रीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 11:08 IST

अनेक गुन्हेगार शहरातच : खादी व ‘खाकी’चे मिळतेय अभय

जळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्या हद्दपार केल्या खरे, मात्र हे आदेश कागदोपत्रीच राहिल्याचे दिसून येत आहेत. काही गुन्हेगारांनी शहर सोडले, मात्र ज्या गुन्हेगारांना राजकीय व खाकीचे अभय आहे, असे गुन्हेगार आजही शहरात वावरताना दिसून येत आहेत. सर्वाधिक हद्दपार गुन्हेगार हे शनी पेठ व एमआयडीसीच्या हद्दीतच असून ते बिनधास्तपणे वावरत आहेत.पोलीस अधीक्षकांनी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची संख्या ही ४५ च्यावर आहे. हे सर्व गुन्हेगार एक व दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार आहेत. त्या-त्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमार्फत या गुन्हेगारांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत तर काहींना अद्याप नोटीसाही बजावण्यात आलेल्या नाही. कायदा व सुव्यव्यस्था अबाधित रहावी, शहर व जिल्ह्यात सौहार्दाचे वातावरण असावे व नागरिक दहशतमुक्त असावे म्हणून वरिष्ठ अधिकारी पोटतिडकीने काम करताना दिसतात, मात्र यंत्रणेतील काही दुवे गुन्हेगार व राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेले असल्याने गुन्हेगारांना अभय मिळत आहे. त्याचे अनेक उदाहरणे आहेत. व्हाईट कॉलर गुन्हेगार हा कारागृहात कमी व रुग्णालयात जास्त असतो. तर हद्दपार झालेला, परंतु व्हाईट कॉलरचा जवळचा समजला जाणारा गुन्हेगार हा कागदोपत्रीच हद्दपार असतो. हद्दपार असताना गुन्हेगार पकडला जातो याचाच अर्थ हद्दपारीच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे सिध्द होते. मोठ्या गुन्हेगारांना मात्र नेहमीच अभय मिळत आलेले आहे.कोम्बिंगमध्ये सापडले तीन हद्दपार गुन्हेगारएमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री राबविलेल्या कोम्बिग आॅपरेशनमध्ये हद्दपार असलेले तीन गुन्हेगार घरीच आढळून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (२३ रा. शिकलकर नगर), रिजवान शेख उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (२२रा. अजमेरी गल्ली, तांबापुरा) व अफजलखान उर्फ फावड्या रशीद खान (२४ रा. तांबापुरा) अशी गुन्हेगारांची नावे आहेत.एमआयडीसी पोलिसांनी कोम्बिग आॅपरेशनमध्ये त्यांच्या हद्दीतील ३५ हिस्ट्रीशीटर, १५ रेकॉर्डवरील गुन्हेगार यांची तपासणी करण्यात केली. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील,सचिन मुंडे, दीपक चौधरी, मुद्दस्सर काझी,सतिष गर्जे, किशोर बडगुजर, सचिन पाटील व योगेश बारी आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव