शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुन्हेगारास कासमवाडीतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 21:18 IST

जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपारचे आदेश असताना शहरात वावरणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलीसांनी कासमवाडीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली. गौरव ...

जळगाव : दोन वर्षांसाठी हद्दपारचे आदेश असताना शहरात वावरणा-या गुन्हेगारास एमआयडीसी पोलीसांनी कासमवाडीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली. गौरव भरत कुंवर (२३,रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, कासमवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्‍द हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कासमवाडी येथील रहिवासी गौरव कुंवर याला दोन वर्षांसाठी हद्दापार करण्‍यात आलेले आहे. परंतु, तो शहरात वावरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. पोलीसांनी मध्यरात्री १ वाजता गौरव याचे कासमवाडीतील घर गाठले. त्यावेळी गौरव हा घराबाहेर दिसून येताच पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, त्याची चौकशी केले असता त्याने कुठलीही परवानगी नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे हद्दपारीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.यांनी केली कारवाईएमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील,मुदस्सर काझी, हेमंत कळसकर, सचिन पाटील आणि चंद्रकांत बळीराम पाटील यांनी कारवाई करत मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी गौरव भरत कुंवर याला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव