शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आगमन मिरवणूक काढणा-या मंडळाच्या पदाधिका-यांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 20:41 IST

व्हीडीओ व्हायरल करणे भोवले : नवी पेठ मित्र मंडळावर कारवाई

जळगाव: कोरोनाच्या पाश्‍र्वभूमीवर गणेशाचे आगमन तसेच विसर्जन मिरवणूक काढण्यासह वाद्य वाजविण्यास बंदी असतांनाही २२ रोजी आगमनाची वाजत गाजत मिरवणूक काढणा‍ऱ्या नवीपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजीनदार, सचिव, सल्लागार व कार्यकर्त्यांविरोधात बुधवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या मिरवणुकीचा व्हिडीओ व्हायरल होवून तो सहायक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहचला होता, त्यानुसार शहर पोलिसांनी केलेल्या तपासणीत तो नवीपेठ मित्र मंडळाचा असल्याने निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवी पेठ मंडळाने २२ आॅगस्ट रोजी स्थापनेच्या दिवशी श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्याचा व्हिडीओ पाच दिवसानंतर व्हायरल झाला. बुधवारी पाच दिवसानंतर हा व्हीडीओ सहायक पोलीस उपअधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहचला. त्यांनी हा व्हिडीओ त्यांनी पडताळणीसाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांना पाठविला. चौकशीअंती व्हिडीओत जागा नवीपेठेतील सारस्वत चौकाकडून जयप्रकाश नारायण चौकाकडे जाणारा रस्ता दिसून येत होता. तसेच आठ ते दहा कार्येकर्ते नाचतांना दिसून येते होते. सार्वजनिक गणेश मंडळ हे नवीपेठ मित्र मंडळ असल्याचे निष्पन्न झाले होते.यांच्याविरुध्द झाला गुन्हा दाखलशासनाचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक मनोष सुभाष पाटील यांच्या फिर्यादीवरुन नवीपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष शामसुंदर झंवर, खजीनदार विनोद अशोक मुंदडा, सचिव सुनील सुरेश जोशी, सल्लागार अमोल राजेंद्र जोशी, मिरवणुकीत नाचणारे कार्यकत, वाद्य वाजविणारे तसेच वाहनमालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वाद्य ताशा तसेच मिरवणुकी वाहन तीनचाकी रिक्षाही जप्त करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव