बोदवड : सटाणा येथील बिल्डरची ४० लाखांत फसवणूक करणाऱ्या बोदवड
येथील तीन जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. यात आणखी दोन ते तीन जण असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुरू आहे.
एरंडोल तालुक्यात
८०० टन युरिया
एरंडोल : एरंडोल तालुक्यात विविध कार्यकारी सोसायटी, शेतकी संघ, घाऊक विक्रेते यांना जिल्हास्तरावरून सुमारे ७०० ते ८०० टन युरियाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.
नगरसेविकांनी विचारला
विकासकामांचा जाब
चोपडा : चोपडा शहरात पाणीपट्टी कमी करण्यावरून पुन्हा सत्ताधारी आणि विरोधी शिवसेनेत आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. यात आता याप्रकरणी नगराध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत नगरसेविका संध्या महाजन यांनीही जाब विचारला आहे.