अंजली दमानियांबाबत आक्षेपार्ह  प्रतिक्रिया  देणाऱ्यांविरोधात गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 05:59 PM2020-11-09T17:59:09+5:302020-11-09T18:11:24+5:30

अमोल व्यवहारे यांनी आपले सरकार पोर्टलवर २३ ऑक्टोबर रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती.

Crime against those who reacted offensively to Anjali Damania | अंजली दमानियांबाबत आक्षेपार्ह  प्रतिक्रिया  देणाऱ्यांविरोधात गुन्हा 

अंजली दमानियांबाबत आक्षेपार्ह  प्रतिक्रिया  देणाऱ्यांविरोधात गुन्हा 

Next

  बोदवड :     सोशीलमीडियावर  प्रतिक्रिया व्यक्त करणे दीपक एसएस व अहेमद खान या  दोन व्यक्तींना भोवले असून त्यांचेविरोधात जळगाव येथील सायबर पोलिस विभागात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये कलम ६७ व भादवि ५०१ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूढील तपासाचे आदेश पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिले आहे.
    याबाबत सवृत्त असे की, समाजसेविका अंजली दमानिया यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीकडून  यूट्यूबवर प्रकाशित केला होता. त्यात  दोघांकडून व्हिडिओच्या खाली समाजसेविका अंजली दमानिया या महिलेविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर  शब्दप्रयोग करण्यात आला होता. त्यामूळे  युवासेनेचे तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी आपले सरकार पोर्टलवर २३ ऑक्टोबर रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानूसारगून्हे दाखल करण्यात  आला आहे. 
        जिल्ह्यातील काही प्रकरणे न्यायालयात न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामूळे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो आम्ही हाणून पाडू असे यावेळी शिवसेनेचे माजी महानगरप्रमूख गजानन मालपूरे यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार अमोल व्यवहारे यांच्यासोबत विशाल पाटिल व लोकेश पाटिल ऊपस्थित होते.

Web Title: Crime against those who reacted offensively to Anjali Damania

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.