शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास, न्यायालयाने ठोठावली शिक्षा

By सुनील पाटील | Updated: August 25, 2022 17:27 IST

शाळकरी अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास ठोठावला आहे.

जळगाव : शाळकरी अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करुन तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या विजय प्रकाश घोडेस्वार याला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपीचे वय 19 वर्षे असून तो भडगाव येथील रहिवासी आहे. अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

दरम्यान, पीडित बालिका पाचोरा तालुक्यात मामाकडे शिक्षणासाठी आलेली होती अशी माहिती समोर आहे. आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असताना विजय घोडेस्वार हा तिचा दुचाकीवरुन शाळेपर्यंत पाठलाग करीत होता. मला तुझ्याशी बोलायचे आहे, प्रेमाच्या गोष्टी करायच्या आहेत, मला किती दिवस फिरवशील, मी दिलेल्या चिठ्ठीला तू लाथ मारली असे एक ना अनेक गोष्टी बोलून तो पीडितेचा छळ करत होता. २१ जुलै २०१७ रोजी विजय याने शाळेजवळच हात पकडून अश्लिल वर्तन केले. घाबरलेल्या पीडितेने घरी जाऊन हा सर्व प्रकार मामाला सांगितला. मामाने घटनास्थळी येऊन चौकशी केली असता विजय घोडेस्वार हा तिथेच आढळून आला. याप्रकरणी मामाच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलिसात विनयभंग (३५४ अ,ड) व पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता.

नऊ साक्षीदारांची तपासणीन्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा तथा विशेष पोक्सो न्यायाधीश बी.एस.महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला. पोक्सोच्या विशेष सरकारी वकिल चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन ९ साक्षीदारांची तपासणी केली. त्यात पीडितेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. आरोपीला दोषी धरुन विनयभंगाच्या तीन कलमाखाली प्रत्येकी एक तर पोक्सोच्या कलमातंर्गत तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सोबत आठ हजाराचा दंडही ठोठावण्यात आला. पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी यात विशेष सहकार्य केले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावCourtन्यायालय