चार वर्षांपासून साखर कारखाना बंद असल्याने वीज आणि पाण्याची अजिबात सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे पिण्यासाठी, शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी तसेच वृक्षरोपण आदी कामासाठी पाण्याअभावी खूप हाल होत होते. जल मिशनअंतर्गतदेखील जवळपास ग्रामपंचायतीची पाइपलाइन उपलब्ध नसल्याने पाण्याची व्यवस्था झाली नाही. ही व्यथा गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यांच्यापुढे वेळोवेळी मांडली. शेवटी त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव यांच्याशी संपर्क साधून शाळेसाठी कूपनलिका खोदकाम करून देण्यात आली. २९ जून रोजी रोटरी क्लब चोपडातर्फे शाळेत कूपनलिका करण्यात आली. साधारणपणे ३०० ते ४६५ फुटावर पाणी लागले. रोटरीमार्फत दिलेल्या या मदतीने शाळेचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला. याबद्दल मुख्याध्यापक तुषार पाटील यांनी रोटरी क्लब चोपडा व सर्व सदस्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम निंबाजी पाटील यांनी पूजन व फलकाचे अनावरण करून कामाची सुरुवात केली. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती प्रतिभा बाबूराव पाटील, उपसभापती सूर्यकांत गोविंद खैरनार, चो.सा.का. चेअरमन अतुल ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. नीलम पाटील, पं. स. सदस्या व माजी सभापती मालूबाई रायसिंग, माजी सभापती कल्पना पाटील, बीडीओ भरत कोसोदे, गटशिक्षणाधिकारी भावना भोसले उपस्थित होते. रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव या यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिव रूपेश पाटील यांनी केले.
यावेळी रोटरीचे महेंद्र बोरसे, प्रफुल्ल गुजराथी, संजीव गुजराथी, अर्पित अग्रवाल, चेतन टाटिया, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी आदींसह शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.