शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात एकाच वेळी ८४ टेबलवर होणार मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:57 IST

जळगाव मतदार संघाची २४ तर रावेर मतदार संघाची २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी

जळगाव : लोकसभा निवडणुकीतील जळगाव लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २४ फेºयांमध्ये तर रावेर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी २३ फेºयांमध्ये करण्यात येणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होऊन त्यात जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ५६.१२ टक्के तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी ६१.४० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सर्व निवडणूक यंत्र महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सुरक्षा कोठडीत सिलबंद करून ठेवण्यात आले असून दोन्ही मतदार संघाची २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे.प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र कोठडीतून काढणार२३ रोजी मतमोडणीसाठी सकाळी उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष निवडणूक यंत्र सुरक्षा कोठडीतून काढण्यात येणार असून मतमोजणीसाठी सहा कक्ष तयार करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. प्रत्येक कक्षात १४ याप्रमाणे जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाची प्रत्येकी ८४ टेबलवर एकाचवेळी मतमोजणी होईल. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक, रो आॅफिसर, सुविधा कर्मचारी, टॅबुलेशन कर्मचारी, माध्यम समन्वयक व इतर सर्व कर्मचारी मिळून दोन्ही मतदार संघासाठी एकूण १३२५ कर्मचारी कार्यरत राहणार आहे. प्रत्येक कक्षातील मतमोजणीवर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हे लक्ष ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अजयकुमार, रावेर मतदार संघाचे निरिक्षक छोटेलाल प्यासी, जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम टपाली आणि ईटीबीपीएसद्वारे झालेले मतदान मोजण्यात येईल. जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ४०२४ टपाली तर ३८९९ सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी २४८५ टपाली तर ११९० सैनिकांचे मतदान प्राप्त झाले आहे.टपाली मतदानाची मोजणी १० आणि ईटीबीपीएस मतदानाची मोजणी १५ टेबलवर होणार आहे. दोन्ही प्रकारची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव