यावल : २८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शनिवारी त्यांना भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
शहरातील वाणी गल्लीतील वर्क आर्डर काढण्याकरिता एका मक्तेदारास पालिकेचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी २८ हजार रुपये लाचेची मागणी केली होती व शुक्रवारी लाच घेताना त्यांना त्यांच्याच कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून अधिक चौकशी करायची असल्याचे सांगत पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती व न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.