शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला ऊसतोड मजुरांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 18:12 IST

यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे३२ मजूर कोरोनाबाधित : बाराशेहून अधिक मजूर व नागरिकांची झाली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रौद्र धारण केले होते. यात आढळून आलेल्या बाधितांमध्ये बहुतांशी गळीत हंगामाहून गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांचा समावेश होता. यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आले असून यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याचा अलर्ट ‘लोकमत’ने सविस्तर वृत्ताव्दारे दिला होता. यानंतर आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील ४० हजाराहून अधिक ऊसतोड मजुर पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात ऊसतोडीसाठी जातात. कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर ते एप्रिल व मे महिन्यात आपापल्या गावी परत येतात. गेल्यावर्षी मजुरांची साखर कारखान्यांनी कोरोना टेस्ट केली होती. याबाबतचे प्रमाणपत्र देऊन त्यांना गावी जाण्यासाठी सोडले होते. यंदा मात्र हे मजूर तपासणी न करताच गावी परतले आहे.

...अन् प्रशासन झाले अलर्ट

दि. ६ जून रोजी खेर्डे व हातले तांडा येथे ३१ ऊसतोड मजुर कोरोनाबाधित आढळून आले. बाधितांची संख्या चांगलीच फुगू लागल्याने नऊ जून रोजी ‘लोकमत’तने 'चाळीसगाव ठरतेय कोरोना हाॕटस्पाॕट’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करुन तपासणीविना गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांचा प्रश्न मांडला होता. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, गटविकास अधिकारी नंदाकुमार वाळेकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी तातडीने ऊसतोड मजुरांच्या तांड्यांवर भेटी देणे सुरु केले. तांड्यांवरील मजुर व नागरिकांच्या टेस्टही सुरु केल्या. एकूण बाराशे मजुर व नागरिकांची तपासणी मंगळवारअखेर झाली आहे. यात ३२ जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.

या तांड्यावर झाली तपासणी

दरातांडा, सुंदारनगरतांडा, विसापूर, आंबेहोळ, तळोंदे प्र.चा., खेर्डे, सांगवी, बोढरे, हातले तांडा, कोंगानगर, मुंदखेडे खु., हिंगोणे सीम, जामडी, राजदेहरे तांडा, घोडेगाव, गोरखपूर तांडा, वलठाण तांडा आदि ठिकाणी बहुतांशी ऊसतोड मजुर व नागरिकांचीही आरोग्य विभागाच्या टीम कडून कोरोना चाचणी केली गेली.

तपासणी मोहिम सुरुच राहणार

बाहेरगावहून येणारे नागरिक, ऊसतोड मजुरांची तपासणी मोहिम पुढेही सुरुच राहणार आहे. नागरिकांनीदेखील याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत बाहेरगावहून येणाऱ्या ऊसतोड मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसात पुन्हा अशा मजुर व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, अशी माहिती नंदकुमार वाळेकर व डॉ. देवराम लांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :JalgaonजळगावChalisgaonचाळीसगावcorona virusकोरोना वायरस बातम्या