शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूध संघात कोरोनामुळे प्रत्येकी हजार टन दूध पावडर व बटरचा साठा, लॉकडाऊनमुळे मागणी ‘लॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 06:39 IST

मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली.

जळगाव : लॉकडाऊनमुळे हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान बंद असल्याने दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्हा दूध संघाकडे एक हजार टन दूध पावडर व एक हजार टन बटरचा साठा शिल्लक आहे. यामध्ये जवळपास ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. संकलित दुधातून दररोज सरासरी ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. असे असले तरी दूध  उत्पादकांना मात्र त्यांची रक्कम नियमित अदा केली जात आहे.मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली.मागणी घटली, दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढलेजिल्हा दूध संघातून जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्हा तसेच मुंबईपर्यंत दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र सर्वच ठिकाणी हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने सर्वच ठिकाणातून दुधाची मागणी घटली आहे. संघात दररोज दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत असताना मार्च-एप्रिलमध्ये केवळ एक लाख पाच हजार ते एक लाख १० हजार लिटर दुधाची विक्री होऊ लागली. अनलॉकनंतर हळूहळू मागणी वाढत जाऊन आता ती दीड लाख लिटर दुधापर्यंत पोहचली आहे. मात्र तरीदेखील अजूनही दररोज जवळपास ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील दररोजचे ८० ते ९० हजार लिटर व आता दररोजचे ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत असल्याने दूध संघाने त्यापासून दूध पावडर, बटर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करणे सुरू केले.हॉटेल सुरू होण्याची प्रतीक्षाजिल्हा दूध संघात शिल्लक दुधापासूून दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढत जाऊन संघात आतापर्यंत एक हजार टन दुधाची पावडर व एक हजार टन बटर तयार झाले आहे. मात्र अजूनही हॉटेल, मोठे रेस्टॉरंट सुरू झालेले नसल्याने पाहिजे, त्या प्रमाणात मागणी नसून हा साठा शिल्लक राहत आहे. यामध्ये दूध संघाचे ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. यासाठी संघाने कर्ज घेतले असून उत्पादन नियमित ठेवण्यासह दूध उत्पादकांनाही वेळेत त्यांची रक्कम अदा केली जात असल्याचे दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली. विशेष म्हणजे दूध उत्पादकांना वाढीव दर दिला असून विक्री दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.दूध संघात नियमित दूध संकलन सुरू असून मार्च-एप्रिल महिन्याच्या तुलनेत सध्या दुधाची मागणी वाढली आहे. मात्र हॉटेल व इतर व्यवहार पूर्णपणे सुरू न झाल्याने दूध शिल्लक राहत आहे. त्यापासून दूध पावडर, बटर तयार केले जात असून सर्व व्यवहार सुरू न झाल्याने त्यालाही जास्त मागणी नाही. असे असले तरी दूध उत्पादकांना वाढीव दर देण्यासह त्यांना वेळेवर त्यांची रक्कम दिली जात आहे.- मनोज लिमये, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा दूध संघ, जळगाव

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाbusinessव्यवसायJalgaonजळगाव