शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना राज्य निरीक्षक आढाव्यासाठी जळगावात येणार - खासदार रक्षा खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:33 IST

पथकाच्या भेटीनंतरही स्थिती न सुधारल्यास केंद्राचे अधिकारी जिल्ह्यात

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाने सूचविलेल्या उपाययोजनांनंतर जिल्ह्यात काय स्थिती आहे, याचा आढावा आठ दिवसानंतर पुन्हा या पथकाकडून घेतला जाणार आहे. तरीही संसर्ग व मृत्यूदर कमी झाला नाही तर केंद्राचे एक अधिकारी जळगावात येतील अशी माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट सिटी मिशनचे संचालक तथा व महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजनांवरील देखरेखीची जबाबदारी असलेले कुणालकुमार पुढील १५ दिवसात स्वत: येऊन आढावा घेणार आहेत, असेही रक्षा खडसे यांनी या वेळी सांगितले.कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी ही माहिती दिली. या वेळी त्या म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आपण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला ११ जून रोजी पत्र पाठवून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात माहिती दिली व जिल्ह्यात केंद्र सरकारचे निरीक्षण पथक पाठवावे अशी विनंती केली होती. तसेच जळगावचे काही वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी राहिलेले स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणालकुमार यांची महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजना संदर्भात देखरेखीसाठी केंद्र्राने त्यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी खासदार रक्षा खडसे यांच्याशी संपर्क साधून दोन अधिकाऱ्यांचे पथक पाठविणार असल्याचे सांगितले होते, असेही खडसे म्हणाल्या.प्रशासनाने लोकप्रतिधींशी समनव्य साधून काम करावेलोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी मिळून काम करायला पाहिजे. खासदार, आमदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधूनच काम झाले पाहिजे, अशी सूचना खासदार खडसे यांनी बैठकीत मांडली. यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले. या सोबतच गोदावरी रुग्णालय येथील कोविड सेंटर येथे आणखी दोन विशेष डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या सूचना खासदार खडसे यांनी दिल्या.जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन हजाराहून अधिक झालेली आहे. तसेच १० जून रोजी कोरोना बाधित वृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या शौचालयात मृतावस्थेत सापडल्यामुळे जिल्हयात संतप्त भावना पसरली होती, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव