वाघडू, ता. चाळीसगाव :
मागील दीड - दोन वर्षांपासून कोराना रोगाचे संकट उभे आहे. आज ग्रामीण भागासह शहरी भागातही सण- वारांवर सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्यावर निर्बंध असल्याने चार दिवसांवर आलेला बैलपोळा यंदाही सार्वजनिक तथा गावच्या वेशीवर साजरा होणार का? शेतकऱ्यांच्या ज्या शेतीवर राबणाऱ्या सर्जा - राजा पोळ्याला तरी मेळ्यात राहतील का, असा संभ्रम शेतकऱ्यांना पडला आहे. यंदा पोळा कसा साजरा करायचा, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये शेतीला खूप मोठे योगदान आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीवर वर्षभर राबणारा सर्जा - राजा अर्थात बैल अन् बैलजोडीला अन्ययसाधारण महत्त्व आहे. वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्जा - राजाला किमान पोळ्याला विश्रांती मिळावी, तसेच या बैलजोडीप्रती त्यांच्या श्रमापोटी एक जाणीव म्हणून अशी भावना शेतकरी व्यक्त करीत असतो आणि हाच तो पोळा सण. वर्षभर ऊन, वारा पावसात शेतकऱ्याबरोबर राबत असतो. पोळ्याची वाट बघून थाटून राहतो. पण, गेली दीड - दोन वर्षे कोरोना या विषाणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे बैलपोळा सणावर बंदी आहे. मागील वर्षीही सर्जा-राजाचा पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्याची वेळ आलेली होती. यंदाचा बैलपोळा दोन दिवसांवर आलेला आहे. बैलपोळा सणाला आदल्या दिवशी खाद्य मळणी केली जाते, तर दुसऱ्या दिवशी बैलांना आंघोळ घालून रंगरंगोटी करून सजवले जाते. झुल्या चढविल्या जातात आणि गावच्या हनुमान मंदिराभोवती एकत्र बैलांचा मेळा भरवतात. अशी परंपरा आजही कायम आहे. पण, बैलपोळा साजरा करण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून हाही बैलपोळा कोणत्या पध्दतीने साजरा होणार का, अशा संभ्रमात शेतकरी आहेत. तरी बैलपोळा गावच्या वेशीवर एकत्र साजरा व्हावा, अशी इच्छा शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत.
...चौकट
पोळ्यासाठी साहित्याची उपलब्धता...
कोरोनामुळे सध्यातरी सण-उत्सवांना परवानगी नाही. यंदासुद्धा पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा करता येईल, अशी आशा शेतकऱ्याला वाटत आहे. पण यंदा हा सण सोमवारी, दि. ६ सप्टेंबर रोजी साजरा होणार असला तरी कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. असे असताना ग्रामीण भागातील शेतकरी बाजारातून बैलासाठी साहित्य खरेदी करताना दिसत आहे. सध्या बाजारात बैलासाठी विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी आले आहे. सार्वजनिक कार्यात सहभागी झाले बरेच नसता घरासमोरच उभी करून बैलांची ओवाळणी होईलच, परंतु बैलपोळ्याच्या मेळा होणार नाही, हे तितकेच नाकारता येणार नाही. अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.