शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाचा विस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 12:54 IST

प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेकडून गांभीर्य हरपले, शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाने पडली भर, मदतीच्या नावाखाली राजकीय मंडळींची केवळ चमकोगिरी

मिलिंद कुलकर्णीखान्देशातील नंदुरबार हे आॅरेंज झोनमध्ये तर जळगाव आणि धुळे रेड झोनमध्ये असताना लॉकडाऊनच्या तिसऱ्या पर्वातील ढिसाळ नियोजनामुळे आठवडाभरात कोरोनाचा विस्फोट झाला. नंदुरबारात २१ रुग्ण, त्याच्या अडीचपट धुळ्यात ५४ रुग्ण तर कितीतरी पटीने जळगावात म्हणजे १७२ च्या आसपास रुग्ण आहेत.प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता अशा तिन्ही घटकांच्या बेपर्वाईने कोरोनाचा विस्फोट झाला. जिल्हा प्रशासनाने दोन टप्प्यात चांगले काम केल्यानंतर तिसºया टप्प्यात कामगिरी घसरली. गोंधळ निर्माण करणारी परिपत्रके, शासकीय विभागांमधील समन्वयाचा अभाव, कर्मचाऱ्यांवर नसलेले नियंत्रण, टाळेबंदीची अंमलबजावणी करताना जनता, लोकप्रतिनिधी यांच्याशी उडालेले खटके याच गोष्टी अधिक गाजल्या. कठोर भूमिका घेऊन प्रसंगी वाईटपणा घ्यावा लागला तरी हरकत नसते. पण वेळ निघून गेल्यावर सक्तीचे लॉकडाऊन केल्यावर हाती काय उरणार हा प्रश्न आहेच.जळगाव जिल्ह्यातील मृत्यूदर अधिक असल्याबद्दल माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे चिंता व्यक्त केली. संचालक डॉ.तात्याराव लहाने यांच्याशी संपर्क साधून त्यांनी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली. अधिष्ठात्यांनी स्थानिक वैद्यकीय अधिकाºयांची समिती नेमून चौकशी केली. पण प्रशासनाची बाजू घेणाराच अहवाल आला. मालेगावला बंदोबस्ताला गेलेले ५ कर्मचारी पळून आले. तर काहींना कोरोनाची लागण झाली. रणछोड कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई झाली.लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाशी समन्वय व जनतेला धीर देणे, समजावून सांगण्याची अपेक्षा होती. परंतु, वेगळेच चित्र समोर आले. काही लोकप्रतिनिधी घरीच थांबले तर काही कार्यकर्त्यांना घेऊन दौरे, फोटोसेशन करताना आढळले. सलग दीड महिन्यापासून अखंडपणे काम करणाºया प्रशासनावर तोंडसुख घेण्याची मर्दुमकीदेखील काहींनी बजावली. तर काहींच्या कुटुंबीयांवर मद्याची हेराफेरी केल्याचे गुन्हे दाखल झाले. दीड महिना लोटल्यानंतर काहींना कोरोनाची आठवण आली आणि मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट वाटपाचे तालुकास्तरीय कार्यक्रम आणि जोडून शासकीय अधिकाºयांच्या आढावा बैठकांचा धडाका लावण्यात आला.दीड महिन्याच्या लॉकडाऊननंतर हातघाईवर आलेल्या व्यापाºयांनी कहर केला. सिंधी कॉलनीत लॉकडाऊनला न जुमानता दुकाने उघडी होती. बळीराम पेठेत मनपाचे पथक येताच दुकानदाराने ग्राहकांना चक्क कोंडून ठेवले. शासकीय आदेशांचा सोयीचा अर्थ काढून दुकाने उघडण्याचा प्रयत्न झाला. पारोळ्यात नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांमध्ये व्यापाºयांच्या प्रश्नावरुन जुंपली.आणि जनतेचे काय विचारता? कोरोना योध्दयांसाठी टाळ्या वाजविणारे, दिवे उजळविणाºया याच जनतेने परीक्षा संपल्याच्या विद्यार्थ्याच्या आनंदासारखा आनंद थोडी सवलत मिळताच दाखविला. दारु दुकानांसमोर लागलेल्या रांगा पाहून तर ‘स्कायलॅब’ कोसळण्याच्या संकटात मिठाईच्या दुकानासमोर लागलेल्या रांगा आठवल्या. मनोवृत्ती तीच.लॉकडाऊनच्या दोन पर्वामध्ये सर्वच यंत्रणांमध्ये संवाद, समन्वय, शिस्त यांचा अंतर्भाव असल्याने जागतिक संकट असलेल्या कोरोनाला खान्देशात थोपविण्यात यश आले. परंतु, तिसºया पर्वात ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.आपत्ती व्यवस्थापन कायद्याचीअंमलबजावणी करताना कठोरता आवश्यक आहे. वेळ निघून गेली की, हाती काही राहत नाही. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकांमुळे गोंधळात भर पडली. त्यात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला. लोकप्रतिनिधींचा अवास्तव हस्तक्षेप डोकेदुखी ठरला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव