शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

कोरोना : त्रस्तता नको; संयम हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:18 IST

बंदी आणि सक्तीच्या आदेशांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर हवा, आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमधील त्रुटी उघड, मंदीच्या वातावरणातून सावरण्यासाठी सरकारी साथ हवी

मिलिंद कुलकर्णीचीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना व्हायरसचा प्रभाव आणि परिणाम संपूर्ण जगभर जाणवू लागताच जागतिक आरोग्य संघटनेने साथ म्हणून त्याची घोषणा केली. अमेरिकेने राष्टÑीय आणीबाणी जाहीर केली. ज्या वेगाने हा आजार पसरत आहे, ती चिंताजनक अशीच स्थिती आहे. सरकारी पातळीवर उपाययोजना होत आहे. परंतु, या स्थितीत त्रस्त होण्यापेक्षा संयम राखण्याची नितांत आवश्यकता आहे.कोरोनापेक्षा इतर आजारांनी मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असताना कोरोनाला महत्त्व का देण्यात येत आहे, त्यामागे काही षडयंत्र तर नाही, अशी शंका समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहे. मात्र इतर आजारांवर प्रतिबंधात्मक लस, औषधी उपलब्ध आहेत. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी अद्याप कोणत्याही औषधाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच एक पर्याय सरकार आणि जनतेच्या हाती राहिला आहे. पुढे जाऊन औषधी, लस सापडेल तेव्हा भीती कमी होऊ शकते.या आजाराची व्याप्ती आणि परिणामकारकता लक्षात येत नसल्याने सरकारी पातळीवर वेगवेगळे प्रतिबंध लावण्यात येत आहे. समूहपातळीवर लागण होत असल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, बाजारपेठा अशा ठिकाणी गर्दी होणार नाही, अशी काळजी घेतली जात आहे.शहर व ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमधील त्रुटी यानिमित्ताने उघड होत आहे. अशा साथरोगाच्या काळात परिपूर्णतेने आम्ही लढू शकत नसू, तर मग सामान्यांचे रक्षण आणि मनोधैर्य वाढविणार कोण? सॅनिटायझर व मास्क वापरा असे आवाहन केले जात असताना त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होत आहे किंवा नाही, हे बघायला हवे की नको. या दोन्ही वस्तू बाजारपेठेतून गायब झाल्या आहेत. काळाबाजार तरी होत असावा किंवा उत्पादन कमी असावे. यातून सामान्य माणसांमध्ये त्रस्तता वाढते.कोरोनापासून बचावासाठी छोटे-छोटे उपाय आहेत, ते अवलंबले तरी आम्ही त्याला अटकाव करु शकतो. पण आम्ही नागरिक म्हणून त्याचा अवलंब करण्यापेक्षा आमच्या सवयींवर टिकून राहतो. किती गाव आणि शहरे निर्मल आहेत? भूमिगत गटारींची स्थिती कशी आहे? रस्ते आणि परिसराची स्वच्छता राखली जाते काय? कचºयाची विल्हेवाट लावली जाते काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक अशीच आहे. त्यामुळे आशिया खंडात भारताला सगळ्यात जास्त फटका कोरोनाचा बसला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. तहान लागली की, विहिर खणण्याची आमची मानसिकता आहे. त्याची प्रचिती या काळात पुन्हा एकदा आली. कोरोनामुळे किमान यंत्रणेत सतर्कता आली तरी खूप झाले असे म्हणावे लागेल.कोरोनाने संपूर्ण जगाला भयकंपीत केले आहे. चीनपाठोपाठ युरोप, अमेरिका आणि भारतात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी पातळीवर बंदी आणि सक्तीचा सरधोपट मार्ग अवलंबला जात आहे.एकीकडे मास्क आणि सॅनिटायझर वापराअसे आवाहन करायचे आणि या वस्तूच बाजारपेठेतून गायब होत आहेत, त्या जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट होऊनही उपलब्ध होत नाही, यावरुन आपत्कालीन काळाशी मुकाबला करण्यासाठी असलेली आमची मर्यादा उघड होते. प्रतिबंधात्मक उपायांविषयी जनजागृती खूप महत्वाची असली तरी त्यात त्रस्तता नको. भावनिक आधार महत्त्वाचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाJalgaonजळगाव