शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कोरोनाच्या संकटात केळी व्यापाऱ्यांनी दिली प्रतिक्विंटल हजार रू.ची शेतकऱ्यांच्या खिशाला चाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:41 IST

बाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय.

ठळक मुद्देकेळीमालाला उठाव जोमातबाजारभाव समितीच्या भावापेक्षा २०० ते २५० रू. कमी भावाची तडजोड करा म्हणजे व्यापाºयांची गाडी बांधावर उभी राहतेय

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : गत वर्षीच्या दुष्काळाच्या राखेतून अग्नीपंख घेऊन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेण्याची आशा उराशी बाळगून असलेल्या केळी उत्पादक शेतकºयांंना यंदा मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन चैत्र नवरात्रोत्सव व रमजान ईदचे पर्व येवूनही व केळीमालाची उपलब्धता अत्यंत कमी प्रमाणात आहे. असे असतानाही केळी व्यापाºयांनी २२ मार्च ते आजतागायत ४७ ते ४८ दिवसात शेतकºयांच्या खिशाला किमान प्रतिक्विंटल एक हजार रूपयांची चाट लावली आहे. या ४७ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दररोज सरासरी किमान २५० ट्रक तालुक्यातून निर्यात होत असल्याचे गृहित धरता १ लाख ८८ हजार क्विंटल केळीमागे १८८ कोटींची निव्वळ उत्पादनाची चाट केळी उत्पादक शेतकºयांना अखेर बसल्याचे मोठे शल्य बोचणारे ठरले आहे.गत वर्षी अत्यल्प व अनियमित पर्जन्यमानामुळे तालुक्यात दुष्काळाचे सावट होते. भूजल पातळी दररोज १०० मीटरने घसरल्याने हजारो हेक्टरमधील केळीबागा पाण्याअभावी तर ४७ ते ४८ सेल्सियस तापमानाची मजल मारलेल्या उन्हाच्या दाहकतेत होरपळून निघाल्या होत्या. किंबहुना त्याच कारणास्तव केळीची मृगबागेची पूर्वहंगामी लागवडीत कमालीची घट झाली होती.केळीने कायापालट होण्याऐवजी व्यापाºयांनी केले भुईसपाटपरिणामी त्या घटत्या लागवडीखालील केळीबागांमधील अत्यल्प केळीमालाला यंदाच्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणाºया केळी हंगामात किमान १२०० ते १३०० रू प्रतिक्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. किंबहुना, कोरोनाच्या लॉकडाऊनचा फतवा जारी होताच केळी व्यापाºयांनी ‘अभी नही तो कभी नही’ अशा एकाधिकार शाहीने केळी हे नाशवंत फळ असल्याने अवघ्या २५० ते ३०० रू प्रतिक्विंटल भावात केळीबागांच्या बख्खी (विळा) लावून केळीबागा आडव्या केल्या. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामार्फत लॉकडाऊनमधील मार्ग मोकळा केल्यानंतरही उत्तर भारतात केळी भरून गेलेले ट्रक खाली करायला मजूर उपलब्ध नाहीत, तिकडे गेलेल्या गाड्या परत येत नाहीत, रस्त्यात गॅरेज वा ढाबे उपलब्ध नाहीत. अशा एकनाविविध बहाण्यांनी किमान प्रतिक्विंटल एक हजार रुपये कमी दराने केळी बागांची सर्रास कत्तल सुरू होती.पश्चिम बंगाल तथा सोलापूर स्थित असलेल्या केळी पॅकेजिंगचे तंत्रकुशल केळी कामगारांचा ताफा असता तर दरदिवशी १५ ते २० कंटेनर आखाती राष्ट्रात रवाना करून केळी उत्पादकांना अपेक्षित असलेल्या दीड हजार रू प्रतिक्विंटल केळीभाव पदरात टाकण्याची धन्यता लाभली असती-सदानंद महाजन, केळी निर्यातदार शेतकरी, तांदलवाडी, ता.रावेर

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर