मुक्ताईनगर, जि.जळगाव : कोणतेही लक्षण नसताना जिल्ह्यातील पोलीस दलातील एका अधिकाऱ्याला कोरोना लागण निष्पन्न झाल्याने पोलीस दलात भीतीचे वातावरणात पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची शनिवारी आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांनी यावेळी ३४ कर्मचाºयांची आरोग्य तपासणी व समुपदेशन केले.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोना वारीयर्स ठरलेले पोलीस कर्मचारी ही कोरोनाच्या संक्रमण छायेत आपले कर्तव्य बजावत आहे. त्या पोलिसांमुळे संसगार्चा धोका अधिक आहे. अशात खात्यातील एक अधिकाºयाची कोरोन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात ही भीती पसरली आहे. कर्मचाºयांचे आरोग्य तपासणी व मनोबल वाढविण्या कामी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नेमणुकीचे अधिकारी व कर्मचारी अशांची डॉ.मराठे यांनी वैद्यकीय तपासणी करण्यात केली.तपासणीत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांच्यासह ३४ पोलीस कर्मचाºयांची आरोग्य तपासणी केली. तसेच आरोग्यविषयक तक्रारी आहेत अशांना योग्य तपासणी, आहारविषयक सल्ले तथा व्यायामाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अबीद खान, राहुल पाटील यांनी सहकार्य केले.
कोरोनाचा धसका : मुक्ताईनगरात पोलिसांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 23:43 IST