लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरूवारी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून नाही तर दोन रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या घटून १८ वर आली आहे. यात शहरातील एक रुग्ण बरा झाला आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाभरात कोरोनाचा एकही मृत्यू नसल्याने दिलासा कायम आहे.
गुरूवारी आरटीपीसीआरचे १०३६ अहवाल समोर आले. तसेच ॲन्टिजनच्या १७३३ तपासण्या झाल्या असून यात एकही बाधित समोर आलेला नाही. दरम्यान, धरणगाव येथे एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये जळगाव शहर ११, भुसावळ ४, चोपडा, पाचोरा, धरणगाव प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या १७ तर लक्षणे असलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. यात एका रुग्णाला ऑक्सिजनची गरज पडत आहे.