शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कॉप्यांचा पडला पाऊस अभियानाचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:13 IST

जळगाव : ‘कॉपी मुक्त’ अभियानाच्या सर्व उपाययोजना दहावीच्या परीक्षेतही फोल ठरल्याचे चित्र असून मंगळवारी पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला बहुतांश ...

जळगाव : ‘कॉपी मुक्त’ अभियानाच्या सर्व उपाययोजना दहावीच्या परीक्षेतही फोल ठरल्याचे चित्र असून मंगळवारी पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला बहुतांश परीक्षा केंद्राबाहेर कॉप्यांचा पाऊस पडला. बारावी परीक्षेप्रमाणे दहावीच्या ‘माय मराठी’च्या पेपरलाही मंगळवारी सर्रास कॉपी सुरू असल्याचे चित्र होते. दहा ते पंधरा फुटाच्या भिंतींवर चढून तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी धडपड सुरू होती़ नूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूने खिडक्यांमधून अक्षरश: कॉप्या बाहेर फेकल्या जात होत्या तर अँग्लो उर्दू हायस्कूलच्या मागील बाजूस चक्क कॉप्यांचा गठ्ठा घेवून तरूण फिरत होते़ तर याठिकाणी प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची जोरदार चर्चा तरूणांमध्ये सुरू होती़ मात्र, प्रत्यक्षात तसे काही दिसून आले नाही़मंगळवारपासून दहावीच्या परीक्षाही प्रारंभ झाली़ सकाळी ११ वाजता पेपर असल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह पालकांनी परीक्षा केंद्राबाहेर १०़३० वाजताच हजेरी लावली़ नंतर विद्यार्थ्यांची अंगझडती घेतल्यानंतर केंद्रात प्रवेश देण्यात आला़ तासभर परीक्षा केंद्रांवर मराठी विषयाचा पेपर सुरळीत चालला़ मात्र, दुपारी १२ वाजेनंतर बहुतांश केंद्रांवर अक्षरश: कॉप्यांचा पाऊस पडला़ केंद्र आवारात जरी शांतता असली तर वर्गांमध्ये सर्रास कॉपी सुरू होती़पत्रावर चढवून पुरविली कॉपीनूतन मराठा विद्यालयाच्या मागील बाजूला कॉपी पुरविण्यासाठी तरूणांची दुपारी १ वाजता चांगलीच गर्दी झाली होती़ यात तरूणांनी चक्क दहा ते पंधरा फुटाच्या उंचीच्या पत्रांंवर चढून कॉपी पुरवित होते़ दुसरीकडे काही तरूण दगडात कॉपी अडकवून खिडक्यांच्या दिशेने फेकत होता़ प्रकार कळताच केंद्र संचालकांनी पोलिसांना माहिती दिली़ व पोलिसांचे पथक विद्यालयात धडकले होते़ दरम्यान, खिडक््यांमधूनही कॉपी केल्यानंतर कागदांंचा पाऊस पडताना दिसून आला़कॉपी पुरविणाऱ्यांनी टोकली धूमनूतन मराठा महाविद्यालय, गुळवे विद्यालय तसेच अँग्लो उर्दू विद्यालयाच्या परिसरात कॉपी पुरविण्यासाठी अनेकांनी चांगलीच गर्दी केली होती़ मात्र, केंद्रसंचालकांकडून याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी मंजुळा तिवारी,उषा सोनवणे तसेच जिल्हापेठ पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात गस्त लावत तरुणांना पिटाळून लावले़ गुळवे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तरुणांनी गर्दी केली होती़ त्याच क्षणी जिल्हापेठ पोलिसांचे डिबी पथक येताच त्या तरुणांनी तेथून पळ काढला़ दरम्यान, पथकाने तब्बल तीनशे ते चारशे मीटरपर्यंत त्या तरूणांचा पाठलाग करून त्यांना पिटाळून लावले़गाईड घेऊन फिरत होते तरूणशहरातील अँग्लो उर्दु हायस्कूलच्या मागील बाजूने काही तरूणांकडून कॉपी पुरविण्यासाठी कसरती सुरू होत्या़ त्यातच एका तरूणाच्या हातात चक्क कॉप्यांची गड्डी होती़ परिसरात पोलीस नसल्यामुळे हे तरूण बिनधास्त कॉपी हातात घेऊन मिरवताना दिसून आले़ नंतर अधून-मधून संधी साधत भिंतींवर चढून कॉपी पुरवताना दिसले़ खुबचंद सागरमल विद्यालयाच्या भिंतीवर चढून कॉपी पुरविण्यासाठी तरूणांच्या कसरती सुरू असल्याचे दिसून आले़

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव