शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय राखून कामे मार्गी लावणार : सीईओ एस. के. दिवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:14 IST

अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांच्याकडून घेतला कार्यभार

ठळक मुद्देकामचुकारांना सोडणार नसल्याचा दिला नवीन सीईओ यांनी इशाराखुलेपणाने काम करण्याची दिली ग्वाहीकौस्तुभ दिवेगावकर यांच्या बदलीनंतर दिवेकर यांची नियुक्ती

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १ : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एस. के. दिवेकर यांनी १ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पदभार स्विकारला. जिल्हा परिषदेतील विविध प्रश्न सुरुवातीस समजून घेत सर्व विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्याशी समन्वय राखून अधिकाधिक कामे मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.२८ रोजी प्रशासनाने बदलीचे आदेश दिल्यावर कौस्तुभ दिवेगावकर यांनी आपला पदभार अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संजय मस्कर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरुपात सोपवला होता. दिवेगावकर यांची बदली पुणे महानगर पालिकेत अतिरीक्त आयुक्त या रिक्त पदावर झाली आहे. तर मुंबई येथील महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांची बदली दिवेगावकर यांच्या जागी जळगाव जि. प . च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली असून त्यांनी हा पदभार गुरुवारी मस्कर यांच्याकडून स्विकारला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर व विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांचा परिचय त्यांनी करुन घेत थोडक्यात आढावा घेतला.खुलेपणाने काम करणारयावेळी दिवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्हा परिषद ही स्थानिका स्वराज्य संस्था असून लोकांचा व लोकप्रतिनिधींचा संपर्क याठिकाणी अधिक येतो. यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांशी तसेच अधिकाºयांशी समन्वय राखून कामे केली जातील. बंदीस्तपणे न राहता खुलेपणाने काम करण्याची आपली पद्धती असून शासनाच्या ध्येयधोरणाची तसेच योजनांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.कामचुकारांना सोडणार नाही !कामात चुका करणारे तसेच कामचुकार कर्मचाºयांवर दया दाखविली जाणार नाही तसेच चांगले काम करणाºयांचे कौतुकही करु, अशी भूमिकाही दिवेकर यांनी स्पष्ट केली. शिक्षण, आरोग्य, कृषी आदी सर्व विभागातील कामे वेळेतच कशी होतील यासाठी आपण दक्ष राहणार आहोत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगावzpजिल्हा परिषद