शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अब्दुल सत्तार व वाकडी ग्रामस्थांमध्ये वाद, प्रकरण दाबत असल्याचा ग्रामस्थांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 12:45 IST

वाकडी येथे सकाळपासूनच राजकीय मंडळींसह सामाजिक कार्यकर्त्यांची रिघ

ठळक मुद्देजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची गावात भेटपोलीस अधीक्षकही दाखल

जामनेर, जि. जळगाव - जामनेर तालुक्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांना मारहाण झाल्यानंतर शुक्रवारी गावामध्ये सकाळपासूनच राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते भेट देत असून गावकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी गावात भेट दिल्यानंतर ग्रामस्थ व आमदार सत्तार यांच्यात वाद झाला.विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेले म्हणून सचिन चांदणे व राहुल चांदणे (रा. वाकडी, ता. जामनेर) या मातंग समाजाच्या दोघं अल्पवयीन मुलांना नग्न करून मारहाण करीत त्यांची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातील वाकडी येथे घडला होता. हा प्रकार गुरुवारी सर्वत्र समजल्यानंतर गावात विविध क्षेत्रातील मंडळी भेट देत आहेत.शुक्रवारी सकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी गावात भेट देऊन माहिती जाणून घेतली. या सोबतच माजी खासदार, डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, ज्योत्स्ना विसपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरूड, राजू वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे, लोकसंघर्ष मार्चाच्या प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे आदींनी गावात भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.राजकीय मंडळींनी हस्तक्षेप करू नयेवाकडी येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली त्या वेळी ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा करताना त्यांना सांगितले की, आमच्या गावात जातीय वाद नाही, तुम्ही राजकीय मंडळी वाद वाढवू नका. त्यावर आमदार अब्दुल सत्तार म्हणाले, आम्हाला माहित आहे, तुम्ही काय करीत आहे. हे प्रकरण तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावरून ग्रामस्थ व आमदार सत्तार यांच्यामध्ये वाद झाला.दबावाखाली काम करू नकापोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनीही गावात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. त्या वेळी आमदार सत्तार यांनी कराळे यांना दबावाखाली काम करू नका, अशा सूचना दिल्या.पोलिसांनी विहीर बदलविल्याचा आरोपमुकुंद सपकाळे यांनी गावात भेटी दरम्यान पोलिसांनी पंचनामा करताना विहीर बदलविल्याचा आरोप केला.दरम्यान, या प्रकरणातील मारहाण करणारे ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार हे दोघे जळगाव येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव