शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गातून सीएमव्ही घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा-डॉ.के.बी.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 15:59 IST

निसर्गातून सीएमव्ही घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा.

ठळक मुद्देएक शिवार - एक फवारणी या तणमुक्त शिवार अभियानातून सीएमव्हीवर एकात्मिक कीड नियंत्रण केळी बागांमध्ये रसशोषक किड नियंत्रणासाठीची फवारणी एकाचवेळी करण्याची गरज

रावेर : निसर्गातून सीएमव्ही (कुक्कुंबर मोझॅक व्हायरस) घालवण्यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणारी कापूस व मका पिकांची दोन वर्ष लागवड थांबवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांनी केले आहे.स्वातंत्र्योत्तर काळात ब्रिटिश सरकारने केळी लागवडीखालील नवीन केळीबागांवर आक्रमण करणाऱ्या कुक्कुंबर मोझॅक व्हायरसच्या निर्र्मूलनासाठी सतत वर्षे केळी लागवडीवर निर्बंध घातले होते. आता मात्र केळी लागवड थोपवणे शक्य नाही. असे असले तरी निसर्गातून सीएमव्हीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रसशोषक किडींचे आश्रयस्थान असलेल्या खरीपातील मका व कापूस पिकांची सतत दोन वर्षे लागवड थांबवावी. आपापल्या गावशिवारात सबंध शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील व गाडीरस्ते तणमुक्त करण्यासाठी ‘एक शिवार - एक फवारणी’ अशी तणमुक्त शेतीशिवाराचे एकात्मिक कीड नियंत्रण अभियान राबविण्याची गरज असल्याचे मत डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले आहे.सन २००१ व २००२ मध्ये तालुक्यातील केºहाळे बुद्रूक व बºहाणपूर तालुक्यातील दापोरा येथे तद्नंतर सन २०१२-१३ व मागील वर्षी सावखेडा, चिनावल, वाघोदा, निंभोरा, विवरे शिवारात या सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याची माहितीही त्यांनी दिली.गत पंधरवड्यातील ढगाळ वातावरणातील पावसाची झिमझिम सुरूच राहिल्याने केळीबागांचे बांधावरील तथा नदीनाले व शिवार रस्त्याच्या कडेवरील तणांपासून, वेलवर्गीय पिकांपासून प्रादुर्भाव होणाºया मावा, तुडतुडे, थ्रिप्स, फुलकिडे, पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रसार झपाट्याने झाला. यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केळी उत्पादक शेतकºयांनी सामूहिकरित्या सीएमव्हीच्या समूळ उच्चाटनासाठी एक शिवार एक फवारणी बांधावरील तथा नदीनाले व शिवार रस्त्याच्या कडेवरील तण नाहीसे करण्यासाठी तणनाशकांची तथा केळी बागांमध्ये रसशोषक किड नियंत्रणासाठीची फवारणी एकाचवेळी करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.रावेर तालुक्यातील ८२ गावातील २ हजार ४९५ शेतकºयांच्या १ हजार ८३५ हेक्टर क्षेत्रातील नवीन लागवडीखालील केळी बागा कुक्कुंबर मोझॅक व्हायरसने बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. ४० ते ४५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर