शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

रिक्षातून पडल्यानंतर कंटेनरने तरूणीला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:12 IST

बांभोरीजवळील घटना : रिक्षाचालकासह चार जण जखमी ; महामार्गावर वाहतूक ठप्प

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बांभोरी जकात नाक्याजवळ ओव्हरटेकच्या प्रयत्नात विद्यापीठातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला कंटेनरची धडक लागल्याने रिक्षा उलटली़ याचवेळी रिक्षेतून महामार्गावर पडलेल्या तरूणीला भरधाव कंटेनरने चिरडल्याने ती जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५.५० वाजेच्या सुमारास घडली. श्रेया सुनील काजळे (वय २६ रा. संभाजी नगर) असे मयत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, रिक्षा उलटल्याने रिक्षाचालकासह तीन विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अपघातामुळे घटनास्थळी वाहतूक विस्कळीत झाली होती.विद्यापीठाच्या वित्त विभागात श्रेया काजळे ही तरुणी कंत्राटी पध्दतीने कामाला होती. सायंकाळच्या सुमारास विद्यापीठाचे कामकाज आटोपल्यानंतर श्रेया काजळे यांच्यासह काही विद्यार्थिंनी रिक्षाने (एमएच़१९़सीडब्ल्यू १५५६) शहराकडे येत होत्या. बांभोरी नाक्यापासून काही अंतरावर रिक्षा ही समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असताना अचानक समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरची धडक रिक्षाला बसली़ अन् क्षणातच धडकेतनंतर रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षेच्या उजव्या बाजुला बसलेली श्रेया काजळे ही रस्त्यावर पडली. याचवेळी जळगावकडून धुळ्याकडे जाणाºया व रिक्षाला धडक देणाºया कंटेनरच्या मागच्या चाकात श्रेया ही आली आणि अंगावरून चाक गेल्यामुळे ती जागीच ठार झाली. रिक्षा उलटल्याने रिक्षाचालक सोनु देवराम पाटील ( २७, रा. शिवाजीनगर), मिनाक्षी विकास बाविस्कर ( २५, रा. शनिपेठ), परमेश्वर पांडुरंग ताठे (३०, रा. केकतनिंभोरा ता. जामनेर), साक्षी धांडे (रा. नागपूर) हे तिन्ही विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काहींवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते़ दरम्यान, कारचा कट लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे रिक्षाचालकाचे म्हणणे होते़रिक्षेच्या पुढील भागाचा चुराडारिक्षा उलटल्यानंतर पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव बी़बी़ पाटील व परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी़पी़पाटील, जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, कर्मचारी अनिल लोहार, शैलेश पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. अपघातानंतर महामार्गावर जवळपास अधार्तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Accidentअपघात