शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

संपर्क फाउंडेशनचा रुग्ण सुश्रृषेतून सेवा यज्ञ : सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 1:01 AM

गंभीर आजाराने पीडीत रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयाना आधार देण्याचा इवलासा प्रयत्न

चुडामण बोरसे जळगाव : सेवेतून संपर्क आणि संपर्कातून रुग्णसेवा असा एक आगळा- वेगळा उपक्रम जळगावातील भारत विकास परिषदेने संपर्क फाऊंडेशनमाध्यमातून सुरु केला आहे. संंत तुकाराम महाराजांच्या ‘सेवा ते आवडी उच्चारावे नाम... भेदाभेद काम निवारूनि’ या अभंगाप्रमाणेच या फाऊंडेशनची वाटचाल सुरु झाली आहे.आजच्या धावपळीच्या काळात नोकरी आणि व्यवसाय सांभाळून घरातील सदस्यांच्या आजारपणात त्यांच्या सेवा - शुश्रृषेसाठी रोज वेळ देणे बऱ्याचदा शक्य होत नाही. यासाठी रुग्णसेवेच्या माध्यमातून संपर्क फाऊंडेशनने मदतीचा हात सुरु केला आहे.गंभीर आजाराने पिडित तसेच चालू- फिरु न शकणाºया रुग्णांना त्यांच्या घरीच प्रशिक्षित, विश्वासू व अनुभवी नर्स, आया, वॉर्डबॉयच्या माध्यमातून सेवा व देखभालीची सुविधा अल्पदरात उपलब्ध करुन देण्याचे सेवाकार्य फाऊंडेशनने सुरुकेले आहे. या उपक्रमात सध्या दिवसाला सहा रुग्णांसाठी सेवा दिली जात आहे. यासाठी फाऊंडेशनच्या कार्यालयात अल्प शुल्क जमा करावे लागते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबाकडून खात्री करुन घेतल्यानंतर सेवा पुरविली जाते.फाऊंडेशनकडे सध्या स्त्री आणि पुरुष परिचारकांची संख्या सहा आहे. गरज पडल्यास नर्सिंग कॉलेज अथवा ओव्हरटाईम करु शकतील, असे वॉर्डबॉयला संधी दिली उपलब्ध करुन दिली जात आहे. १२ मार्च २०१८ रोजी एका ट्रस्टची स्थापना करण्यात आली. यानंतर १३ आॅगस्ट २०१८ रोजी या संपर्क फाऊंडेशनच्या कार्याला सुरुवात झाली. यासाठी पुरुषोत्तम न्याती, तुषार तोतला, रवींद्र लढ्ढा, डॉ. अमित चौधरी, डॉ. स्रेहल फेगडे, चेतना नन्नवरे, राजीव नारखेडे, शरद कोत्तावार, नंदकुमा जैस्वाल, तसेच भारत विकास परिषदेचे प्रसन्न मांडे, विशाल जोशी, अमित मेनन, चेतन दहाड, प्रशांत महाजन सहकार्य करीत असतात.एखाद्या रुग्णाकडे वॉर्ड बॉय नियुक्त करायचा असल्यास त्याला त्याचा मेहनताना दिला जातो. यातून मग सेवाही घडत असते. सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ अशा ड्युटी लावण्यात येतात. यासाठी संपर्क फाऊंडेशन १०, पहिला मजला, टूरिस्ट संकुल, नेहरु चौक येथे संपर्क साधावा, असे आवाहन पुरुषोत्तम न्याती यांनी केले.भारत विकास परिषदेच्या माध्यमातून पुणे आणि औरंगाबाद येथे जयपूर फूट निर्मितीचा कारखाना आहे. तसेच लातूर येथे फिरते युरिनल व्हॅन कार्यरत आहे. त्याचप्रमाणे जळगावतही नवीन काही करण्याचा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. -पुरुषोत्तम न्यातीसंपर्क फाऊंडेशनच्या या रुग्णसेवा उपक्रमात आणखी वाढ करण्याचा मनोदय आहे. या रुग्ण सुश्रेषेसोबत रुग्णांसाठी सर्जिकल साहित्य उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे,-तुषार तोतला

टॅग्स :Jalgaonजळगाव