दि. १३ रोजी सकळी ११ वाजता राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहना पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तेथून तहसील कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढली व तहसीलदारांना निवेदन दिले.
केंद्र शासनाने इंधनाच्या दरात प्रचंड दरवाढ केली असून त्यामुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या किमतीत प्रचंड घसरण झालेली असतानादेखील भारतात पेट्रोल व डिझेल चढ्या दराने विकले जात आहे. त्यात रोजच्या रोज वाढ होतच आहे. असे असताना केंद्र शासन घरगुती वापराच्या गॅसच्या दरात महिन्याभरात १०० रुपयांची दरवाढ करून महागाईत तेलच ओतले आहे.
इंधन दरवाढ कमी न झाल्यास चोपडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुकाध्यक्ष अध्यक्ष के. डी. चौधरी, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश शिंदे, मधुकर बाविस्कर, प्रदीप पाटील, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, नंदकिशोर सांगोरे, माजी सभापती प्रमोद पाटील, प्रा. अनिल सूर्यवंशी, वाजहतअली काझी, जहागीर पठाण, इलियास शेख, हर्षल शिंदे, भगवान पाटील प्रा. शैलेश वाघ, डॉ. जितेंद्र पाटील, भगवान पाटील, देवानंद शिंदे, देविदास धनगर, जीवन बागूल, डॉ. एस. जी. सदाफुले, क्रांती क्षीरसागर, डॉ. देवानंद पाटील यांच्यासह एनयुएसआयचे चेतन बाविस्कर व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.