शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

राज्यभरात काँग्रेस व राष्ट्रवादीने बुडविली सहकार चळवळ : शेखर चरेगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:55 IST

चाळीसगाव येथे झालेल्या सहकार परिषदेत शेखर चरेगावकर यांचे टिकास्र

ठळक मुद्देराज्यातील ११ जिल्हा बँका अडचणीतआठ तालुक्यातील २०० पेक्षा जास्त पदाधिकाºयांची उपस्थितविविध कार्यकारी संस्था, दूध सोसायट्या यांनी आपली कार्यपद्धती जनताभिमुख करण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव : दि.१५ : काँग्रेस व राष्ट्रवादी उठसुठ यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा जप करुन सहकार चळवळ नेस्तानाबूत केली जात असल्याची हाकाटी पिटतात. मात्र त्यांनीच सहकार चळवळ मोडून काढल्याची टिका महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी येथे केली.सोमवारी राजपूत मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता झालेल्या सहकार परिषदेत चरेगावकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपिठावर आमदार उन्मेष पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष संजय बिर्ला, संघाचे सहसंघटन मंत्री दिलीप पाटील, जनसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश पोतदार, लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते. चाळीसगावच्या जनसेवा पतसंस्था व सहकार भारती शाखेने या परिषदेचे स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन केले होते. परिषदेला आठ तालुक्यातील २०० हून अधिक सहकारी संस्थांच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.राज्यातील ११ जिल्हा बँका अडचणीतचरेगावकर यांनी केंद्र व राज्य सरकार सहकार चळवळीचे बळकटीकरण करीत असून यासाठी गेल्या तीन वर्षात घेतलेल्या निर्णयांची सखोल माहिती त्यांनी दिली. ५१ कोटींचा डिव्हीडंड वाटप, अडचणीतील जिल्हा बँकांना मदत, ९७ वी घटना दुरुस्ती असे क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतले. तीन वर्षांपूर्वी २८ जिल्हा बँका अडचणीत होत्या. सद्यस्थितीत ही संख्या ११ वर आली आहे. विरोधकांनी शिखर बँकेलाही नख लावले. तेच विरोधक आता सरकारचे धोरण सहकार विरोधी असल्याचा गळा काढत असल्याचे त्यांनी सांगितले.स्पर्धेत टिकायचे तर तंत्रस्नेही बनासहकारी संस्थांसमोर खासगी संस्थांचे प्रबळ आवाहन उभे राहिले आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना आपली वहिवाट सोडून नव्या मार्गाने मार्गक्रमण करावे लागणार आहे. असे सांगतांनाच शेखर चरेगावकर यांनी व्यवसायिक दृष्टीकोन, संस्थांचे यांत्रिकीकरण, सहकारातंर्गत सहकार, अद्ययावत प्रशिक्षणे घेण्याची तयारी असे बदल स्विकारले पाहिजे, असा मंत्रही त्यांनी यावेळी दिला.आपल्याकडे सहकारातही राजकारणजागतिक पातळीवर सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक आहे. आपल्याकडे त्यात राजकारण पाहिले जाते. जळगाव जिल्ह्यातील पतसंस्था अडचणीत असल्याचे चित्र उभे केले जाते. अर्थात ते काहीअंशी खरे असले तरी याच जिल्ह्यात भरीव काम करणा-या संस्था देखील आहेत. गाव पातळीवरील विविध कार्यकारी संस्था, दूध सोसायट्या यांनी आपली कार्यपद्धती जनताभिमुख करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रयोगशिलतेवर मंथन व्हावेसहकार चळवळीत कुणी काय केले. यापेक्षा नवीन प्रयोगशिल काय करता येईल, यावर मंथन झाले पाहिजे. नविन संकल्प घेऊन सहकार बळकट करण्यासाठी कटिबद्ध झाले तरच ही चळवळ टिकेल आणि समृद्ध होईल. असे आमदार उन्मेष पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रवीण अमृतकार यांनी केले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव