शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थी यादीत घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 11:53 IST

Pradhan Mantri Awas Yojana : ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत शासनाच्या निकषाप्रमाणे कुटुंबांची निवड करून याद्या मंजुरीसाठी पंचायत समितीकडे दाखल केल्या असून, १००पैकी ९२ ग्रामपंचायतींचे २३ हजार ८८९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

पाचोरा : सन २०२२पर्यंत सर्वांसाठी घरे या केंद्र शासनाच्या संकल्पनेतून ‘प्रधानमंत्री आवास योजना’, अनुसूचित जातीसाठी ‘रमाई आवास योजना’, जमातीसाठी ‘शबरी आवास योजना’ अंतर्गत बेघर कुटुंबाला शासन अर्थसहाय्य देऊन सर्व जनतेला निवारा या मूलभूत गरजेसाठी अनुदान देत आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या यादीत मोठा घोळ झाल्याचे दिसून येत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत शासनाच्या निकषाप्रमाणे कुटुंबांची निवड करून याद्या मंजुरीसाठी पंचायत समितीकडे दाखल केल्या असून, १००पैकी ९२ ग्रामपंचायतींचे २३ हजार ८८९ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापैकी ३ हजार ५९९ अर्ज नामंजूर करत १५ हजार ८७४ अर्ज पात्र ‘ड’ यादीत दाखल केले आहेत. अद्याप आठ ग्रामपंचायतींचे ४ हजार ४०६ अर्ज बाकी आहेत.

‘ड’ यादीत निकष धाब्यावर ठेवून घोळबेघरांसाठी घरकुल योजना असली, तरी स्थानिक राजकारणातून या यादी तयार करताना ड यादीचे निकष धाब्यावर बसवून लाभार्थ्यांची निवड केल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. यात पिंपळगाव हरेश्वर येथील २,२०० प्रस्ताव पाठविले असताना, त्यातील १,६०० मंजूर झाले आहेत. यातही खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवून राजकीय कार्यकर्त्यांनी एका कुटुंबातील अनेक लोकांची नावे दाखल करून घोळ केल्याचे राष्ट्रीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले आहे. बऱ्याच गावांमध्ये निकष न पाहता, यादी मंजूर करून लाभार्थी निवड केल्याचे दिसून आले आहे. यामुळे यादीत घोळ निर्माण झाला आहे.

एसईसीसी-२०११नुसार घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे जे निकष ठरविण्यात आले आहेत, त्याबाबत बऱ्याच ठिकाणी दुर्लक्ष करत यादी मंजूर केल्याचे दिसून येत आहे. तसेच या योजनेत निकषांकडे दुर्लक्ष झाल्याने ही ‘ड’ यादी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

सन २०१६-१७ ते २०२०-२१ दरम्यान प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर ३ हजार ७५४ घरकुलांपैकी २ हजार ३८६ घरकुले पूर्ण झाली तर १ हजार ११० अपूर्ण असून, २६८ घरकुलांचे काम चालू आहे. रमाई आवास योजनेंतर्गत ५५९ घरकुले मंजूर असून, त्यापैकी ४०९ पूर्ण झाली आहेत तर १५० घरकुले अद्याप अपूर्ण आहेत. ७१ घरकुलांचे काम सुरू आहे.

आदिवासी अनुसूचित जमातीच्या शबरी आवास योजनेंतर्गत तालुक्यात २५७ घरकुले मंजूर असून, यापैकी १७० घरकुले पूर्णत्वास आली आहेत तर ८७ घरकुले अपूर्ण आहेत. साठ घरकुलांचे बांधकाम चालू आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव