शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी केलेल्या मतदार संघांमध्ये अटीतटीचे अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:42 IST

११पैकी सात ठिकाणी उमेदवारी मिळाली असताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीने वाढविला सेनेचा संताप

जळगाव : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. जिल्ह्यात सत्ताधारी भाजपच्या उमेदवारीचा विचार केला तर यंदा भाजपच्या वाटेला सात जागा आल्या खºया मात्र युती असतानाही शिवसेनेचा उमेदवार असलेल्या जिल्ह्यातील चारही मतदार संघात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा संताप वाढविला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्या मतदारसंघात अटीतटीचे अंदाज वर्तविले जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११ पैकी सहा जागा भाजपच्या ताब्यात असल्या तरी या निकालात आपले वर्चस्व भाजप कायम राखते की शिवसेना मुसंडी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२०१४च्या विधानसभा निवडणुकीवेळी युती नसल्याने भाजप व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढले होते. त्या वेळी भाजपने सर्व ११ जागी उमेदवारी दिली होती. त्यात सहा मतदार संघात त्यांना विजय मिळविता आला. या विजयी उमेदवारांमधील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन, जळगाव शहर मतदार संघातून आमदार सुरेश भोळे, भुसावळमध्ये संजय सावकारे, रावेरमध्ये हरिभाऊ जावळे यांना या वेळी उमेदवारी मिळाली. मात्र उन्मेष पाटील यांची खासदारकीपदी वर्णी लागली तेथे मंगेश चव्हाण तर मुक्ताईनगरातून विजयी एकनाथराव खडसे यांना उमेदवारीच नाकारण्यात येऊन त्यांची कन्या अ‍ॅड. रोहीणी खडसे-खेवलकर यांना व अमळनेरातून गेल्या वेळी अपक्ष निवडणूक लढवित विजय मिळविणारे आमदार शिरीष चौधरी यांनी संधी मिळाली.या सात जागा भाजपच्या वाटेला आल्यानंतरही शिवसेनेची उमेदवारी असलेल्या चार मतदार संघात भाजपच्या पदाधिकाºयांनी बंडखोरी केली. यामध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून चंद्रशेखर अत्तरदे, चोपडा येथे प्रभाकर सोनवणे, एरंडोलला गोविंद शिरोळे, पाचोºयात अमित शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे नाराजी व्यक्त केली. या विषयावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतच जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मतदानाच्या दिवशीदेखील त्यांनी भाजपकडून केवळ २० टक्केच सहकार्य मिळाल्याचे सांगत उघड-उघड नाराजी व्यक्त केली.बंडखोरी झालेल्या मतदार संघात वेगवेगळ््या सर्व्हेनुसार अटीतटीच्या लढतीचे अंदाज वर्तविले जात आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेनेच उमेदवार गुलाबराव पाटील यांना प्रतिस्पर्धीपेक्षा झालेल्या एकूण मतदानापैकी केवळ दोन टक्के मते जास्त असल्याचा अंदाज सांगितला जात आहे. अशाच प्रकारे चोपडा मतदार संघात लता सोनवणे यांना एक टक्केच मते जास्त असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.शिवसेनेचीही भाजपच्या मतदारसंघात बंडखोरीमुक्ताईनगर मतदारसंघातही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनीच बंडखोरी केल्यामुळे येथेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या ठिकाणीही चंद्रकांत पाटील यांना मिळणाºया मतांमध्ये व भाजपच्या उमेदवार अ‍ॅड. रोहीणी खडसे यांच्या मतांमध्ये केवळ पाच टक्क्यांचा फरक वर्तविला जात आहे.एकूणच २०१४मध्ये ११ जागा लढवून सहा ठिकाणी विजय मिळणाºया भाजपने या वेळी सात जागा व चार ठिकाणी केलेली बंडखोरी यामुळे एक प्रकारे सर्व ११ ठिकाणी भाजपने निवडणूक लढविली. त्यामुळे आता किती जागांवर भाजप विजय मिळविते, या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव