शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 13:05 IST

दोन आठवड्यात तिस-यांदा ढगाळ वातावरण

ठळक मुद्देजळगाव शहरासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावजोरदार पाऊस झाल्यास नुकसान

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १५ - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होऊन पुन्हा शेतकºयांची चिंता वाढविली आहे. गुरुवारी सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. तीन आठवड्यांपासून अधून मधून वातावरण बदलत असल्याने शेतमालाचे नुकसान होण्यासह आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात आहे.जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चार-पाच दिवसाआड ढगाळ वातावरण होत आहे. सोबतच पावसाचाही शिडकाव होत आहे. उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा हवामानावर परिणाम होऊन दोन आठवड्यांपासून अशी स्थिती निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. ५ मार्च रोजी ढगाळ वातावरणासह पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ११ मार्च रोजी तशीच स्थिती होती. आता पुन्हा १५ मार्च रोजी सकाळपासूनच शहरात व जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोबतच जळगाव शहरातील काही भागासह रावेर तालुक्यात पावसाचा शिडकावा झाला.बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकºयांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे. मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.याबाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली असता रेकॉर्डवर घेण्याइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्याचा पिकांवर परिणाम होणार नाही. तसेच बहुतांश पीक काढले गेले आहे. किंवा काढणी सुरू आहे. त्यामुळे ढगाळ हवामानाचा त्यावर परिणाम होण्याची भीती नाही. फक्त जोरदार पाऊस आल्यास मात्र या काढणी सुरू असलेल्या पिकावर डाग पडण्याची व ते पीक खराब होण्याची भिती असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस