शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

जनता कर्फ्युचा गैरफायदा घेऊन कंपनीतून लांबविले संगणक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 21:09 IST

दोघांच्या मुसक्या आवळल्या : चार दिवसानंतर गुन्हा उघड

जळगाव : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधनांनी रविवारी जनता कर्फ्यू लागू करुन त्या दिवशी जनतेने घराबाहेर न निघण्याचे आवाहन केले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी एमआयडीसीतील मोरया ग्लोबल लि.या कंपनीच्या कार्यालयाच्या कुलुप तोडून १ लाख १८ हजार रुपये किमतीचे चार संगणक, प्रिंटर व सीपीयु चोरुन नेल्याचा प्रकार उघड झाला. दरम्यान, चार दिवसानंतर बुधवारी पोलिसांनी हा गुन्हा उघड केला असून सागर देवचंद महाजन (१९,रा. रामेश्वर कॉलनी) व मनोज आधार सोनवणे (१९,रा.आसोदा रोड, के.सी. नगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून चारही संगणक व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.पंतप्रधानांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी रात्रीपासूनच एमआयडीसीतील सेक्टर नंबर डी. १०४ व डी.१०५ मध्ये असलेली मोरया ग्लोबल लि. कंपनी बंद करण्यात आली होती. २३ रोजी कंपनी उघडली असता कार्यालयाचे कुलुप तुटलेले होते तर संगणक, प्रिंटर्स, सीपीयु चोरी झाल्याचे उघड झाले होता. त्यामुळे कंपनीतील पुरुषोत्तम बद्रीनाथ पाटील (४७, रा. सदगुरु नगर, अयोध्या नगर) यांनी तक्रार दिल्यावरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी गुन्हे शोध पथकातील सहायक पोलीस अमोल मोरे, अतुल वंजारी,आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय नेरकर, जितेंद्र राजपूत, गोविंदा पाटील, इम्रान सैय्य्द, असीम तडवी, सचिन पाटील य योगेश बारी यांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने तपासाची चक्रे फिरवली असता ही चोरी सागर देवचंद महाजन व मनोज आधार सोनवणे या दोघांची केल्याचे उघड झाले. पथकाने बुधवारी दोघांना त्यांच्या घरातून साहित्यासह ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव