शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 19:45 IST

जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सभा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचना

जळगाव : अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. याकरिता संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. त्यावेळी बोलत होते. या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, समितीचे सदस्य सचिव योगेश पाटील, जिल्हा महिती अधिकारी विलास बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सहायक पोलीस निरीक्षक पी. एस. सपकाळे यांच्यासह आदिवासी विकास, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.अर्थसहाय्य तातडीने मंजूर करापीडितांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणार नाही. याकरिता पोलीस विभागाने अशा गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने करण्याच्या सूचना तपासी अधिकारी यांना द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी यांनी सभेत सांगितले. त्याचबरोबर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पीडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करण्याच्या सूचनाही दिल्यात.३८ गुन्हे पोलीस तपासावरसभेच्या सुरुवातीला समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी ऑगस्टअखेर अनुसूचित जातीची २३, तर अनुसूचित जमातीची १५ असे एकूण ३८ गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती दिली. त्यापैकी १४ गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित २४ व सप्टेंबपर्यंत दाखल झालेले सहा असे एकूण ३० गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. तपासावर असलेल्या गुन्ह्यांमध्ये विनयभंग ६, दुखापत/गंभीर दुखापत ६, खुनाचा प्रयत्न १, बलात्कार १, जातीवाचक शिवीगाळ १ व इतर १५ प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सप्टेंबर २०२० मध्ये ३१ पीडितांना एफआयआर दाखल झाल्यानंतर १८ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव